शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

Coronavirus: आई कोरोनाबाधित तर वडील झाले क्वारंटाईन: मनसेने घेतली नवजात कन्येची जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 21:30 IST

कोरोना अहवालाच्या गोंधळामुळे मन:स्ताप सहन करावा लागलेल्या या महिलेला मनसेने मदत केली होती.

ठाणे: मनसेने मदत केलेल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला रविवारी कन्यारत्नाचा लाभ झाला. दुर्देवाने आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे वडिलांनाही क्वारंटाईन रहावे लागले. त्यामुळे या नवजात बाळाच्या संगोपनासाठी मनसेने पुढाकार घेतला असून मनसेच्या उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्कन्डे यांनी या बाळाची सोमवारी जबाबदारी घेतली.

कोरोना अहवालाच्या गोंधळामुळे मन:स्ताप सहन करावा लागलेल्या या महिलेला मनसेने मदत केली होती. तिने 14 जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आईला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नवजात बाळाच्या वडिलांनाही विलगीकरणात रहाणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या नवजात कन्येच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मनसेच्या महिला उपशहर अध्यक्षा समीक्षा मार्कन्डे यांनी त्या नवजात कन्येच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. तिला समीक्षा यांनी सोमवारी रुग्णालयातून आपल्या कोपरी येथील घरी नेले. त्यावेळी ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि शहर सचिव निलेश चव्हाण हे उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेMNSमनसे