शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी उकळणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:37 IST

व्यापाऱ्यांकडून महिना २० हजारांची मागणी.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या औद्योगिक वसाहतीतील व्यापाऱ्यांना त्यांच्या मनसेच्या माथाडी कामगार सेनेचा सदस्य व्हा अन्यथा कारखाने चालू देणार नाही, असे सांगून महिना २० हजारांची खंडणी  व्यापाऱ्यांकडून उकळणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यास नवघर पोलिसांनी अटक केली आहे. 

औद्योगिक वसाहतीत भाईंदर स्टेनलेस स्टील मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स नावाची  संस्था आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचा पदाधिकारी चंद्रशेखर  जाधव हा साथीदारांसह मिळून व्यापाऱ्यांना त्याच्या संघटनेचे सभासद व्हा, नाही तर तुमचा कारखाना चालू देणार नाही. अन्यथा महिना २० हजार रुपये पाकीट द्या, असे धमकावत असे. 

खंडणी, धमक्यांंना कंटाळल्यानंतर तक्रारयेथील स्टील भांडी बनवणारे दीपक अग्रवाल, मोहन बिश्नोई, प्रभुलाल गुज्जर, किशोरभाई देढिया, मिठालाल पड्यार, अशोक पुरोहित, मनोहर गुज्जर, धरमसिंह गुज्जर आदींकडून एप्रिल २०२४ पासून दर महिना २० हजारांची खंडणी उकळली. त्यानंतर २५ जानेवारी रोजीही अग्रवाल, गुज्जर आदी व्यापाऱ्यांना धमकावले. अखेर नेहमीच्या खंडणी आणि धमक्यांना कंटाळून व्यापाऱ्यांनी २९ जानेवारी रोजी नवघर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. फिर्यादीनंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून चंद्रशेखर जाधव याला अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवास गारळे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :MNSमनसेCrime Newsगुन्हेगारी