शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये मनसेचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:32 IST

चुकीच्या ठिकाणी स्वयंचलित जिना; प्रवाशांसाठी ठरतोय गैरसोयीचा

अंबरनाथ : अंबरनाथ स्थानकात ज्या फलाटावर स्वयंचलित जिन्याची गरज होती त्या ठिकाणी जिना न बसवता स्थानकाबाहेर बसविण्यात आला आहे. त्यामुळे या स्वयंचलित जिन्याचा वापर प्रवाशांसाठी होतच नाही. या चुकीच्या नियोजनाविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रेल्वेस्थानकात आंदोलन केले. या आंदोलनानंतर रेल्वेच्या अधिकाºयांनीही सरकते जिने चुकीच्या ठिकाणी लावल्याचे कबूल केले. मात्र, या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.अंबरनाथ स्थानकात फलाट एक आणि दोन या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. दोन्ही फलाटांवर एकाच वेळी गाड्या आल्यावर प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. सर्व स्थानकांमध्ये स्वयंचलित जिने बसविण्याचे काम सुरू असताना अंबरनाथ स्थानकातही एक स्वयंचलित जिना मंजूर करण्यात आला. स्थानकातील फलाट क्रमांक एक, दोन आणि तीन पैकी एकाही फलाटावर हा सरकता जिना बसविण्यात आला नाही. उलट फलाट क्रमांक-एकच्या पलीकडे मोकळ्या जागेवर सरकता जिना बसविण्यात आला आहे. मुळात या जिन्याचा वापर लोकलमधून उतरणाºया एकाही प्रवाशाला होत नाही.रेल्वे प्रशासनाच्या या चुकीच्या नियोजनाचा निषेध करण्यासाठी मनसेने अंबरनाथ रेल्वेस्थानकात आंदोलन केले. जिल्हा संघटक संदीप लकडे आणि शहरप्रमुख कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.

टॅग्स :ambernathअंबरनाथrailwayरेल्वेMNSमनसे