शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मते मिळविण्यासाठी मनसेला करावी लागणार प्रयत्नांची पराकाष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 7:42 PM

चार मतदारसंघांत अनेक जण इच्छुक : युतीची डोकेदुखी वाढणार

- अजित मांडकेठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु, लाव रे तो व्हिडीओमुळे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती. त्यानंतर, आता उशिराने का होईना, पक्षाने राज्यात विधानसभेच्या १०० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यामध्ये ठाण्यातील चारही जागा लढविण्याचा पक्षाचा विचार असून त्यासाठी काही मोजक्याच इच्छुकांची नावे समोर आली आहेत. ती श्रेष्ठींकडे पाठविली आहेत. असे असले तरी काहींनी आतापासूनच सोशल मीडियावर प्रचारसुद्धा सुरू केल्याचे दिसत आहे. परंतु, पक्षाला चारही मतदारसंघांमध्ये मते मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.ठाण्यात मनसेचा एकही नगरसेवक नसला तरी त्यांची पारंपरिक अशी सुमारे एक लाखांच्या आसपास मते आहेत. ती मते आता मिळविण्यासाठी मनसेचा प्रयत्न असणार आहे. लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतली होती. मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास मनसेच्या अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती. त्यामुळे ही मते आता निर्णायक ठरणार आहेत. त्यानंतर, झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे शहर विधानसभेतून निलेश चव्हाण यांना आठ हजार ३८१ मते मिळाली होती. परंतु, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून सेजल कदम यांना आठ हजार ५७८ मते मिळाली होती. तर, ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सुधाकर चव्हाण यांना २० हजार ५६८ मते मिळाली होती. ठाण्यात मनसेचा तसा बऱ्यापैकी बोलबाला आहे.

दरम्यान, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची चांगलीच घसरण झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तर मनसेला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानुसार, पक्षाची आताच्या घडीला या मतदारसंघात अंदाजे एक लाखांच्या आसपास मते असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मतांमध्ये वाढ करण्याबरोबरच शिवसेना आणि भाजपला त्यांना कांटें की टक्कर देण्यासाठी तगडे उमेदवार पक्षाला द्यावे लागणार आहेत. दुसरीकडे आता मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची लगबग सुरूझाली आणि इच्छुकांची भाऊगर्दीही या पक्षात काही प्रमाणात का होईना दिसत आहे.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत ठाण्यातील चारही मतदारसंघांतून काही प्रमुख नावे श्रेष्ठींकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह महेश कदम यांची नावे पुढे आली आहेत. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि राजश्री नाईक, तर ओवळा-माजिवडा मतदारसंघातून संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आणि प्रसाद सुर्वे आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातून सुशांत सूर्यराव, महेश साळवी यांची नावे श्रेष्ठींकडे गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता कोणाच्या पारड्यात पक्ष उमेदवारी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाण्यात आंदोलनाच्या माध्यमातूनच मनसेचा चेहरा दिसला आहे. मात्र, महापालिकेत त्यांचे प्रतिनिधित्व दिसून आले नाही. त्यामुळे मतांची बेगमी मिळविण्यासाठी मनसेला राज ठाकरे यांचा करिष्मा किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणेShiv SenaशिवसेनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019