शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांना केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 15:38 IST

गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा दादागिरी बघायला मिळाली आहे.

ठळक मुद्देस्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्यानंतर आता ठाणे शहर मनसेने शहरातील परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे आणि कोलबाड परिसरातील स्थानिक कोळी समाज आहे, त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मनसेची आहे. 

ठाणे - गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा दादागिरी बघायला मिळाली आहे. स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्यानंतर आता ठाणे शहर मनसेने शहरातील परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील विविध भागात मासे विक्रीचा व्यवसाय करणा-या परप्रांतियांना मनसे स्टाईलने बेदम चोप दिला.

मासे विक्री करणाऱ्या आगरी कोळी बांधवांना परप्रांतिय मासे विक्री करणाऱ्यामुळे त्रास होत असल्याची आणि त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार मनसेकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार शुक्रवारी शहराच्या विविध भागात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून परप्रांतिय मासे विक्री करणा-यांना मनसे स्टाईलने चोप देण्यात आला. कोलबाड भागातील आगरी कोळी समाजातील मासे विक्रेत्यांना या परप्रांतिय मासे विक्री करणा-यांचा त्रास होत होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या मासे विक्री करणाऱ्याना येथून पिटाळू लावण्यात आले आहे.

कोलबाड परिसरातील रस्त्यांवर अनेक मच्छी विक्रेते बसतात. एक रांगेत जवळपास 20 ते 25 मच्छी विक्रेते बसतात. यातील बहुतेक मच्छी विक्रेते हे परप्रांतीय आहेत, असा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ठाणे आणि कोलबाड परिसरातील स्थानिक कोळी समाज आहे, त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मनसेची आहे. 

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी आपल्या स्टाइलनं आंदोलन केलं.  रेल्वे स्टेशनांच्या आसपास 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे मनसेला नवं बळच मिळालं आहे.  

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMNSमनसे