मनसेने केला सत्ताधारी सेनेचा जाहीर निषेध
By Admin | Updated: September 14, 2015 23:31 IST2015-09-14T23:31:58+5:302015-09-14T23:31:58+5:30
२० वर्षांच्या कार्यकाळात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. जे-जे लोकोपयोगी प्रकल्प उभारत, ते-ते सर्व अपूर्ण, अर्धवट वा बंद आहेत.

मनसेने केला सत्ताधारी सेनेचा जाहीर निषेध
डोंबिवली : २० वर्षांच्या कार्यकाळात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. जे-जे लोकोपयोगी प्रकल्प उभारत, ते-ते सर्व अपूर्ण, अर्धवट वा बंद आहेत. याचा केडीएमसी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा शहर मनसेने जाहीर निषेध करून साखळी उपोषण केले. पूर्वेकडील टिळक पथावर असलेल्या महापालिकेच्या नव्या वास्तू समोरच हे आंदोलन करण्यात आले.
शहरातील बालभवनाचा निर्णय नाही, बीएसयूपी प्रकल्प अर्धवट, काँक्रिटचे रस्ते अर्धवट, क्रीडा संकुलातील सर्व प्रकल्प बंद, भाजी मार्केट बंद, पूर्व-पश्चिम ठाकुर्ली ब्रीज अद्याप नाही, समांतर रस्ता, रेतीबंदर खाडीपूल अद्याप नाही, २७ गावांचा प्रश्न अर्धवट, डोंबिवली बस डेपो अजून बंद, डम्पिंग ग्राउंड प्रश्न अर्धवट व इतर अनेक प्रकल्प बंद वा अर्धवट, तेही फक्त डोंबिवलीचेच अन्यंत्रही असाच प्रकार आहे असे सांगण्यात आले. या वेळी पक्षाचे सचिव राजू पाटील, शहराध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक मनोज घरत, मंदा पाटील, राहुल चितळे, प्रकाश भोईर यांच्यासह केडीएमटीचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे, मनोज राजे उपस्थित होते. संध्याकाळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांना निवेदन देऊन ते मागे घेण्यात आले.