शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

बुलेट ट्रेनच्या विरोधासाठी मनसेचे थेट राष्ट्रपतींनाच साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:18 IST

बुलेट ट्रेनचा विरोध दिवसेंदिवस वाढत असताना आता महाराष्ट्रात हा प्रकल्प नको, असे पत्रच मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रपतींना पाठवले आहे.

ठाणे : बुलेट ट्रेनचा विरोध दिवसेंदिवस वाढत असताना आता महाराष्ट्रात हा प्रकल्प नको, असे पत्रच मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रपतींना पाठवले आहे. ठाण्यातील दमाणी इस्टेट येथील पोस्ट आॅफिसातून ते पोस्ट केले. ठाण्यातून राष्ट्रपतींना ५० हजारांपेक्षा जास्त पत्रे पाठवून महाराष्ट्रात हा प्रकल्प नको, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असून यासाठी रेल्वेस्थानक आणि बसस्थाकावर ठिकठिकाणी स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधीपासूनच विरोध दर्शवला आहे. ठाणे जिल्ह्यातदेखील या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात येत असून जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व्हेलादेखील यापूर्वी मनसेने विरोध केला आहे. मात्र, तो डावलून शासनाच्या वतीने मोजणीचे काम सुरूच असल्याने अखेर राष्ट्रपतींनाच याबाबत मनसेने साकडे घातले आहे. राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा आहे, रेल्वेचा विकास करण्याची विनंती केली आहे. देशातील १२५ करोड जनता अंतर्गत रेल्वेवर अवलंबून आहे. मात्र, मूठभर श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबवला जात आहे. दरवर्षी अपघातामध्ये हजारो नागरिक मरण पावतात, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. मुंबईमध्ये तर रेल्वेचा प्रवास अतिशय जीवघेणा झाला आहे. आपल्या पत्रामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचेदेखील उदाहरण दिले आहे. उत्तर प्रदेशात एका ठिकाणी रेल्वे फाटक नसल्यामुळे काही शाळकरी मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रेल्वेमध्ये अंतर्गत सुधारणा करण्याऐवजी काही श्रीमंत लोकांसाठी बुलेट ट्रेनवर करोडो रु पये खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल या पत्रामध्ये मनसेने केला आहे.देशाच्या अनेक भागांमध्ये अजूनही रेल्वेसेवा पोहोचलेली नाही. त्यामुळे आधीही अंतर्गत रेल्वेसेवा सुधारावी आणि बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी आम्ही पत्रामध्ये केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. राष्टÑपती हे कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे आम्ही त्यांना हा प्रकल्प नको म्हणून पत्र पाठवत आहोत. अजूनही ५० हजार पत्रे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासन याबाबत काही ठोस पावले उचलत नसले, तरी मनसे बुलेट ट्रेनला कायम विरोध करत राहणार असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.आज ठाणेकरांशी चर्चाठाणे : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (एमएएचएसआर) म्हणजेच बुलेट ट्रेनसाठी ठाणे जिल्ह्यातील १९ हेक्टर जमिनीचा वापर होणार आहे. या जमिनीवरील वनसंपदेचे आयुर्मान वाढवण्यासाठी आवश्यक शास्त्रोक्त उपाययोजना करून पर्यावरणसंवर्धन व संतुलन राखण्याच्या दृष्टीने पर्यावरणतज्ज्ञांचे मार्गदर्शन व त्यावरील ठाणेकरांची मतेमतांतरे, प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी राष्टÑीय हायस्पीड रेल निगमने (एनएचएसआरसीएल) ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २९ मे ला पर्यावरणीय जनसल्लामसलत बैठकआयोजिली आहे. मात्र, जिल्ह्यातील २५० शेतकºयांची जमीन यात बाधित होणार असली, तरी या बैठकीत जमीन संपादनाविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बुलेट ट्रेनच्या ५०८.१० किलोमीटरच्या मार्गापैकी जिल्ह्यातील मार्ग ३९.६६ किलोमीटर आहे. या मार्गाची रु ंदी १७.५ मीटर इतकी असून बीकेसीपासून ठाणे तालुक्यातील शीळपर्यंत २१ किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे. त्यापुढे मात्र ४८७ किलोमीटर म्हणजे अहमदाबादपर्यंत तो एलिव्हेटेड आहे. हा मार्ग जमिनीपासून १० ते १५ मीटर उंच असेल. या मार्गातील दोन खांबांतील अंतरही ३० मीटर इतके असणार आहे. या प्रवासादरम्यानच्या वनसंपदेवर संभाव्य धोक्यांविषयीच्या उपाययोजनांवर बैठकीत विचारविनिमय होणार आहे.केंद्र सरकारच्या या बुलेट ट्रेन ठाण्याच्या खाडीतून ४० मीटर खोल बोगद्यातून जाईल. ठाणे परिसरात येताना ती ठाणे खाडी, कोपरखैरणे, सावली, घणसोली, महापे, अडवली, भुतवली अशी शीळपर्यंत भुयारी मार्गाने धावणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMNSमनसे