शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मल्टिप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थ विक्रीविरोधात मनसे आक्रमक; कल्याणमध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 18:44 IST

बाहेरून आणलेला वडापाव मल्टिप्लेक्समध्ये खात मनसेने निषेध नोंदवला

कल्याण  : मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या चढ्या दरानं होणारी विक्री आणि बाहेरील खाद्यपदार्थांना असलेल्या बंदीविरोधात न्यायालयाने फटकारल्यानंतर आता मनसेनेही याविरोधात दंड थोपटले आहेत. मुंबई, ठाण्यापाठोपाठ आज कल्याणामध्येही मनसेने मल्टिप्लेक्सविरोधात आंदोलन केले. बाहेरून आणलेला वडापाव मल्टिप्लेक्समध्ये खात मनसेने आणत आपला निषेध नोंदवला.कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात असणाऱ्या मल्टिप्लेक्सवर आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धडक दिली. मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ आणि पाण्याची बाटली विक्रीदरांबाबत राज्य शासनाने नियमावली आखून दिली आहे. मात्र, मल्टिप्लेक्स चालकांकडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे सांगत या नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी मल्टिप्लेक्स प्रशासनाला दिली. तसेच लवकरात लवकर कार्यवाही केली नाही तर खळ्ळखट्याक स्टाईलने त्याचे उत्तर दिले जाईल, असा इशाराही मनसेकडून यावेळी मल्टीप्लेक्स प्रशासनाला देण्यात आला. या आंदोलनात मनसे प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण