शहरं
Join us  
Trending Stories
1
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
2
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
3
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
6
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
7
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
8
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
9
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
10
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
11
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
12
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
14
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
15
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
16
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
17
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
18
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
19
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले

मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनसे आक्रमक, नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून केलं आंदोलन

By अजित मांडके | Updated: January 8, 2025 13:28 IST

Thane News: पालिकेने मैदानावरील अतिक्रमण त्वरीत हटवावे यासाठी मनसेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

- अजित मांडके ठाणे -  ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदाराने गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक व मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचे आरक्षण असून देखील, महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे मैदान डंपिंग ग्राउंड बनले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेने हे अतिक्रमण त्वरीत हटवावे यासाठी मनसेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून, काही ठिकाणी विकासकांकडून टीडीआरमार्फत विकास कामे केली जातात. घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीने विकसित होत असून, येथे हावरे, रौनक, भूमी सारखे मोठे विकासक काम करत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने ठाणे महानगरपालिकेने बोरिवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे. पण या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही. ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केले असून, तिथे आर एम सी प्लांट तसेच शेड उभारली आहे आणि पाईपची साठवणूक केली आहे. या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना  नाहक सहन करावा लागत आहे.

बोरीवडे मैदान येथे अतिक्रमण झाल्याचे मनसेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केल्यानंतर क्रीडा विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी त्वरित महानगरपालिकेच्या नगर अभियंता ,उपनगर अभियंता तसेच माजीवाडा मानपाडा येथील सहाय्यक आयुक्त यांना पत्र करून सदर मैदान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले पण सदर आदेशाचे पालन महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता करत नसल्याकारणाने मनसेच्या वतीने आज महानगरपालिकेच्या आवारात नगर अभियंतांच्या दालना बाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवण्यात आला तसेच सदर फुटबॉल वर निषेदाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून सदर फुटबॉल नगर अभियंता यांना भेट देण्यात आला.

‘‘घोडबंदर येथील बोरिवडे मैदान येथे केलेले अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात आले नाही तर मनसेच्या वतीने पुढच्या वेळेला आयुक्तांच्या दालना बाहेर निषेध नोंदवण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल.- स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसे जनहित व विधी विभाग

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMNSमनसे