शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीए अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:27 IST

रस्ता रूंदीकरण, काँक्रिटीकरणाचे काम सुरू; कांदळवनाचा केला ऱ्हास

मीरा रोड : भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदानापासून मोर्वापर्यंत एमएमआरडीएने चालवलेल्या रस्त्याच्या कामास केंद्राच्या मीठ विभागाने जागेच्या मालकीवरून घेतलेला आक्षेप, मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड, अर्धवट चाललेले काम यावरून टीका होत असतानाच या कामामुळे कांदळवन क्षेत्राचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. या जागी कांदळवनाचा ºहास झाल्याप्रकरणी आधी गुन्हा दाखल झाला असतानाही या क्षेत्रात काम केले जात असल्याने हे काम थांबवून कंत्राटदार आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.विकास आराखड्यात असलेल्या भार्इंदर पश्चिमेस बोस मैदानापासून मोर्वापर्यंतच्या ३० मीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी घाईघाईने खोदकाम व काँक्रिटीकरणाचे काम कंत्राटदार करत आहे. सध्या जिकडे मोकळी जागा मिळेल, तिकडे खोदकाम करून रस्ताबांधणी सुरू आहे. मुर्धा, राई, मोर्वा गावांत अनेक ठिकाणी जुनी घरे व अन्य बांधकामे असून रहिवाशांचा विरोध पाहता तिकडे तूर्तास रस्ता रुंदीकरणाचे काम टाळले आहे.रुंदीकरणासाठी मोठी जुनी झाडे तोडली आहेत. ही झाडे तोडताना पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती नसताना तसेच न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले गेले आहे. एमएमआरडीएने रस्ता रुंदीकरणासाठी केंद्र सरकारच्या मीठ विभागाच्या जागेवरच काम सुरू केले आहे. काम करण्यासाठी कोणतीही परवानगी एमएमआरडीए वा पालिकेने मीठ विभागाची घेतलेलीनाही.मीठ विभागाचे अधीक्षक राजेंद्र सिंह यांनी लेखी तक्रार महापालिका, पोलीस ठाणे आदींकडे करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. मीठ विभागाच्या जमिनीची मालकी असतानाच दुसरीकडे सीआरझेडमध्ये काम चालवले असताना त्याचीही परवानगी घेण्यात आल्याबद्दल साशंकता आहे.महत्त्वाची बाब म्हणजे बोस मैदानासमोर व पुढे मुर्धा खाडीपर्यंतच्या मार्गावर दाट कांदळवन असून भराव केल्याप्रकरणी सरकारनेच महापालिका कंत्राटदारासह डम्परचालकाविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कांदळवन व त्यापासून ५० मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम करण्यास कायद्याने मनाई आहे. उच्च न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. तर, ज्या ठिकाणी कांदळवनात भराव, बांधकामे झाली आहेत, ते काढून पूर्वीसारखे करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे.असे असतानाही थेट कांदळवनात खोदकाम व रस्त्याचे बांधकाम केले जात असल्याने एमएमआरडीएकडूनच पर्यावरणाचा ºहास होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. एमएमआरडीएचे अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करून यंत्रसामग्री जप्त करण्याची मागणी दुष्यंत भोईर यांनी केली आहे.अधिकाऱ्यांकडून डोळेझाक : कांदळवनात राजरोस बेकायदा काम सुरू असताना मंडळ अधिकारी, तलाठी डोळेझाक करून कंत्राटदाराचा फायदा पाहत असल्याने त्यांना निलंबित करून सहआरोपी करण्याची मागणी प्रदीप जंगम यांनी केली आहे. तर, पालिकेचे प्रभाग अधिकारी गोविंद परब यांनी घटनास्थळी जाऊन कांदळवनात काम करण्याबाबतची परवानगी विचारली असता ती नसल्याचे कंत्राटदाराच्या कर्मचाºयाने सांगितले.

टॅग्स :mira roadमीरा रोड