शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

मीरारोड येथे रुग्णालय उभारणीसाठी १८० कोटींच्या निधीसाठी आमदार सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 18:38 IST

मीरारोड मधील रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर रुग्णालय बांधण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात १८० कोटी रुपयांची तरतूद करावी असे  साकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे

मीरारोड - मीरारोड मधील रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर रुग्णालय बांधण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात १८० कोटी रुपयांची तरतूद करावी असे  साकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे . महानगरपालिका हद्दीतील आरक्षण क्र. ३०२ हा भुखंड रूग्णालयासाठी आरक्षित आहे . १३ हजार चौमी क्षेत्राचा हा भुखंड पालिकेने टीडीआर देऊन ताब्यात घ्यावा अशी मागणी जून २०२० पासून आयुक्तां कडे चालवली आहे . सदर रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर अद्ययावत रूग्णालय तसेच डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था व परिचारिका यांच्या प्रक्षिशण केंद्राची उभारणी होऊ शकते असे सरनाईकांचे म्हणणे आहे . 

सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मीरा भाईंदरच्या रूग्णालयासाठी १८० कोटी रूपयांची तरतूद करावी अशी विनंती सरनाईक यांनी केली आहे. रूग्णालयाच्या निर्मितीसाठी किमान ३ ते ४ वर्ष लागणार असून ही रक्कम सरकारकडून टप्याटप्याने महानगरपालिकेला द्यावी, जेणेकरून रूग्णालयाची उभारणी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालय उभारण्याच्या मागणीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले . 

कोरोना'च्या संकट काळात शहरामध्ये रूग्णालयांची संख्या अपुरी पडून अनेक रुग्णांचे हाल झाले. काही खासगी रूग्णालयांनी गलेगठ्ठ बिले आकारली व जनतेची लूट केली. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भाईंदर मधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय तर मीरारोड मधील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय अपुरे पडत आहेत . त्यामुळे नवीन सुसज्ज सरकारी रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना