शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आमदार रविंद्र फाटक पुन्हा रूग्णालयात, साप चावल्याची प्राथमिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 22:31 IST

मुंबईतील खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. रविवारी ते पुन्हा घरी परततील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

ठाणे : ठाण्यातील विधानपरिषदेचे आमदार रविंद्र फाटक यांना पुन्हा शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असली तरी त्यांना साप चावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

मुंबईतील खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. रविवारी ते पुन्हा घरी परततील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी सायंकाळी ते रुग्णालयातून घरी परतले होते. रात्री ते आराम करण्यासाठी येऊर येथील बंगल्यावर गेले होते. सकाळी बाथरूममधे त्यांना साप चावला. त्यानंतर त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांचा निकटवर्तियांनी सांगितले, रविवारी ते घरी येतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेMLAआमदारhospitalहॉस्पिटल