शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आमदार, महापौरांचे लसीकरण बेकायदा; भाजपचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:31 PM

नियमानुसारच घेतली लस, महापौरांनी केला दावा

ठाणे  : मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. अशातच आता नियम डावलून महापौर नरेश म्हस्के यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. परंतु आपण नियमानुसारच लस घेतल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. याउलट लस मिळावी म्हणून डुंबरे यांनी माझ्याकडे पत्रव्यवहार केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

महापालिकेने बाळकूम येथे उभारलेल्या विशेष कोविड हॉस्पिटलमध्ये २० फेब्रुवारी रोजी म्हस्के,  शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी लस घेऊन फोटोसेशन केले होते. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाशी युद्ध करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जात आहे. त्यात फ्रंटलाइन वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींचा फ्रंटलाइन वर्कर्समध्ये समावेश केलेला नाही. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. असे असतानाही म्हस्के व फाटक यांनी बेकायदेशीरपणे कोरोना लस घेतल्याचा आरोप डुंबरे यांनी केला.

लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना आरोग्य व पोलिसांबरोबरच लोकप्रतिनिधींचाही समावेश करावा, अशी मागणी म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २ डिसेंबर रोजी केली होती. मात्र, ती पूर्ण झालेली नाही. परंतु आपल्या पदाचा गैरवापर करीत म्हस्के व फाटक यांनी रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकून लस घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

महापौर कार्यालयातून माझ्याकडे लस घेण्यासाठी पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत मागण्यात आली. भविष्यातील लसीकरणासाठी यादी तयार केली जात असल्याचे मला वाटले होते. त्यानंतर लगेच मला लस घेण्याची सूचना करण्यात आली. यासंदर्भात सरकारी यंत्रणांकडे चौकशी केल्यावर केवळ फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आपण लस घेतली नसल्याचेही डुंबरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणे