आमदार कुमार आयलानी ठरले, ब्रदर्स ऑफ इयर्स
By सदानंद नाईक | Updated: August 30, 2023 17:40 IST2023-08-30T17:40:12+5:302023-08-30T17:40:57+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-२, येथील आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालयात रक्षाबंधनासाठी हजारो सर्व जातीधर्माच्या महिलांनी गर्दी केली होती.

आमदार कुमार आयलानी ठरले, ब्रदर्स ऑफ इयर्स
उल्हासनगर : भाऊ बहिणीचे नाते वृद्धिंगत करणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी आमदार कुमार आयलानी यांना आमदार संपर्क कार्यालयात ५ हजार बहिणींनी राखी बंधीन औक्षण केले. गेल्या ६ वर्षांपासून भाऊ-बहिणीचा सोहळा होत असल्याची माहिती माजी महापौर मीना आयलानी यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-२, येथील आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालयात रक्षाबंधनासाठी हजारो सर्व जातीधर्माच्या महिलांनी गर्दी केली होती. आमदार आयलानी यांनी हजारो महिलांचा आशीर्वाद राखीचा सन्मान केला. सकाळ पासून सुरू झालेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम दुपारपर्यंत सुरू होता. आमदार कुमार आयलानी यांच्या धर्मपत्नी व माजी महापौर मीना आयलानी यांनीही महिला सोबत कार्यक्रमात भाग घेऊन, त्यांचा आदरसत्कार केला. संपूर्ण हाताला राख्या बांधल्यानंतर आमदार आयलानी यांनी हजारो बहिणीच्या आशीर्वादानेच शहर विकास कामे विना अडथळे व सुखरूप पूर्ण होतात. तसेच प्रत्येक कामला प्रेरणा मिळत असल्याचे आयलानी म्हणाले.