आमदार आयलानी यांनी घेतली वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची बैठक

By सदानंद नाईक | Updated: November 3, 2023 18:45 IST2023-11-03T18:44:52+5:302023-11-03T18:45:01+5:30

उल्हासनगरातील वाहतूक कोंडीवर तोडगा

MLA Ailani held a meeting of traffic police and municipal officials | आमदार आयलानी यांनी घेतली वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची बैठक

आमदार आयलानी यांनी घेतली वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची बैठक

उल्हासनगर : ऐन दिवाळी सणा दरम्यान वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका अधिकारी, व्यापारी संघटना व वाहतूक पोलीस यांची गुरवारी बैठक घेतली. मार्केट मध्ये जड वाहतुकीला काही भागात निर्बंध ठेवण्यात आले.

उल्हासनगरातील नेहरू चौक परिसरात जपानी व गजानन कपडा मार्केट प्रसिद्ध असून फटाका मार्केटसह फर्निचर मार्केट आहेत. ऐन दिवाळी सणा दरम्यान नागरिकांनी खरेदीसाठी मार्केट मध्ये गर्दी केल्याने, वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार कुमार आयलानी यांनी महापालिका अधिकारी, व्यापारी संघटना नेते, वाहतूक पोलीस अधिकारी यांची गुरवारी बैठक घेतली. यावेळी वाहतूक पोलीस व महापालिकेने याबाबत काय उपाययोजना केली. याची माहिती घेऊन, मार्केट मध्ये दुपारी १२ ते रात्री १० वाजे पर्यन्त जड वाहतुकीस निर्बंध करण्याची चर्चा झाली.

आमदार कुमार आयलानी यांनी बोलाविलेल्या बैठकीला शॉपकीपर अशोषियेशन अध्यक्ष दीपक छतलानी, सचनांद गोपलानी, मेघराज लुंड, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस बी गायकवाड, उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, जेठा करम चंदानी, अनिल खतुराणी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते. आयलानी यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे युवानेते ओमी कलानी, मनोज लासी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेश दुर्गानी यांनी वाहतूक पोलीस व महापालिका अधिकाऱ्या सोबत बैठक घेऊन शहरातील मुख्य मार्केट मधील वाहतूक कोंडी व गैरसोयीची माहिती घेवून सूचना दिल्या आहेत

Web Title: MLA Ailani held a meeting of traffic police and municipal officials