शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मितेश जगताप आत्महत्या प्रकरण : खटला मागे घेण्यासाठी कुटुंबीयांना पुन्हा धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 09:14 IST

ऑटोमोबाइल इंजिनिअर मितेश जगतापच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पुन्हा एकदा मिळाले आहे.

कल्याण : ऑटोमोबाइल इंजिनिअर मितेश जगतापच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र पुन्हा एकदा मिळाले आहे. यामुळे मितेशचे कुटुंबीय दहशतीच्या वातावरणात आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने जानेवारी 2017मध्ये आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून मितेशनं आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर मितेशच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गंभीर दखल घेत डिसेंबर महिन्यात टिटवाळा पोलिसांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान हे प्रकरण मागे घेण्यासाठी जगपात कुटुंबीयांना निनावी धमकीचे पत्र मिळाले आहे.  या पत्राद्वारे पोलिसांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे.  यापूर्वी फेब्रुवारी 2018मध्येही त्यांना अशाच पद्धतीचे धमकीचे पत्र मिळाले होते.

मितेशने टिटवाळ्यातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्‍महत्‍या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. मितेशच्या आत्महत्येनंतरही कुटुंबीयांना पोलिसांचा जाच सुरूच राहिल्यानं कंटाळून टिटवाळ्यातील राहते घर सोडून डोंबिवलीमध्ये स्थलांतर केले. न्याय मिळविण्यासाठी तसेच दोषींवर कारवाईसाठी न्यायालयात धाव घेतली. पण दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना वारंवार धमकी दिली जात आहे.

फेब्रुवारी 2018मध्येही मिळाले होते धमकीचे पत्रफेब्रुवारी महिन्यात मितेशची आई पुष्पा जगताप या टिटवाळामधील जुन्या घरी गेलेल्या असताना त्यांना धमकीचे निनावी पत्र मिळाले. या पत्रात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो लगेच मागे घ्या. पोलिस जेवढे पैसे देतात तेवढे पैसे घ्या, गप्प बसा. कमी असेल तर सांगा जास्त पैसे मिळतील. पोलिसात विरोधात कोर्टात जाऊन माघार घ्यायची आहे. त्यात तुमचे भले आहे. तक्रारदार राहिले नाहीत तर केस रद्द होईल. बघा विचार करा आता फक्त गोडीत समज देतो. नंतर मात्र सर्व काही हातून जाईल. काही दिवस तुमच्या हाती आहेत. काळजी घ्या अशा आशयाचे धमकीचे पत्र अज्ञाताकडून मिळाले होते. 

या निनावी पत्रामुळे जगताप कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अज्ञात व्यक्ती विरोधात मृत पुष्पा जगताप यांनी टिटवाळा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. प्रकरण कोर्टासमोर सादर होऊ नये म्हणून खटला मागे घेण्यासाठी निनावी पत्राद्वारे धमकाविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पुष्पा जगताप यांनी केला आहे. न्यायालयाने दोषी आरोपींना कडक शिक्षा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

फेब्रुवारी महिन्यात मिळालेले धमकीचे पत्र

टॅग्स :Crimeगुन्हाSuicideआत्महत्या