भातसा नदीत उडी मारलेला तरुण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST2021-07-21T04:26:43+5:302021-07-21T04:26:43+5:30

वासिंद : भातसा नदीच्या पात्रात साेमवारी सायंकाळी गेरसे पुलावरून उडी मारलेला तरुण बेपत्ता झाल्याची नोंद वासिंद पोलीस ठाण्यात करण्यात ...

Missing youth jumps into Bhatsa river | भातसा नदीत उडी मारलेला तरुण बेपत्ता

भातसा नदीत उडी मारलेला तरुण बेपत्ता

वासिंद : भातसा नदीच्या पात्रात साेमवारी सायंकाळी गेरसे पुलावरून उडी मारलेला तरुण बेपत्ता झाल्याची नोंद वासिंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वासिंदजवळील वेहळे गावात राहणारा विश्वनाथ अशोक देसले (वय २४) हा आसनगाव येथे खासगी कंपनीत कामाला होता. साेमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आपल्या एका साथीदारासाेबत घरी जात असताना वासिंद पूर्वेतील भागात गेरसे पुलावरून भातसा नदीच्या पात्रात त्याने उडी मारली. ताे अद्याप बेपत्ता असून सर्व ग्रामस्थ त्याचा शोध घेत असल्याचे गावातील उपसरपंच सचिन देसले यांनी सांगितले. याबाबत त्याच्या नातेवाइकांनी वासिंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक जी. एन. कोळी करीत आहेत.

Web Title: Missing youth jumps into Bhatsa river