शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

संगणकासह महत्त्वाच्या फाइल झाल्या गहाळ, दिवा प्रभाग समितीत प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 03:16 IST

कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरांत एकीकडे अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनावर टीका होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे संगणक आणि फाइल गहाळ झाल्याने पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यालयातील संगणक आणि काही महत्त्वाच्या फाइल गहाळ झाल्या असून याची चौकशी आता सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या ज्या दिवशी बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री संगणक आणि फाइल गहाळ झाले आहेत. यावेळी कार्यालयात दिवा प्रभाग समितीचे तत्कालीन सहायक आयुक्त येऊन गेल्याची नोंद सुरक्षारक्षकांनी केली आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरांत एकीकडे अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनावर टीका होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे संगणक आणि फाइल गहाळ झाल्याने पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.महापालिकेतील उपायुक्तांसह सहायक आयुक्तांवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी १७ आॅगस्ट रोजी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. राज्य शासनाच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वीच दोन उपायुक्त तसेच चार सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी ठाणे महापालिकेच्या सेवेत दाखल झाल्याने संध्याकाळी उशिरा बदल्यांची आॅर्डर काढण्यात आली होती. यामध्ये कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची मुंब्रा, तर मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर, दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांची निवडणूक विभागात बदली केली आहे. या बदल्यांमुळे अधिकारीवर्गात काही प्रमाणात नाराजीचे वातावरणदेखील असल्याची चर्चा आहे.बदल्या झाल्या त्याच दिवशी रात्री घडला प्रकारज्या दिवशी या बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री उशिरा दिवा प्रभाग समिती कार्यालयातील संगणक आणि काही महत्त्वाच्या फाइल गहाळ झाल्या असल्याची खात्रीलायक माहिती उघड झाली आहे. ठाणे महापालिका मुख्यालयातून दोन संगणक तत्कालीन आयुक्तांच्या मागणीनुसार दिवा प्रभाग समिती कार्यालयातून मागवण्यात आले होते.दिवा प्रभाग समितीच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार आणि कार्यालयीन अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार १७ आॅगस्ट रोजी सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.४६ वाजता तत्कालीनसहायक आयुक्त पुन्हा दिवा प्रभाग समिती कार्यालयात आल्याची नोंद आहे.च्यामुळे या प्रकरणात आता काय कारवाई होणार, असे प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात दिवाप्रभाग समितीच्या तत्कालीन सहायक आयुक्तांशी संपर्ककेला असता तो होऊ शकलेला नाही.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेdivaदिवा