बेपत्ता मुलांना बारा तासांत शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST2021-07-02T04:27:35+5:302021-07-02T04:27:35+5:30

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागात राहणारे १४ वर्षीय कृष्णा कोळी आणि त्याचा भाऊ अंकुश कोळी हे दोघेही बुधवारी ...

The missing children were found within twelve hours | बेपत्ता मुलांना बारा तासांत शोधले

बेपत्ता मुलांना बारा तासांत शोधले

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागात राहणारे १४ वर्षीय कृष्णा कोळी आणि त्याचा भाऊ अंकुश कोळी हे दोघेही बुधवारी सायंकाळी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार अंबरनाथ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. अवघ्या बारा तासांत अंबरनाथ पोलिसांनी या दोन्ही मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील कृष्णा आणि अंकुश कोळी हे दोघे भावंडेे घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाले होते. ते घरी न परतल्याने त्यांच्या घरच्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात या दोघा भावांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या दोन्ही मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच सोशल मीडियावर या दोन्ही मुलांचे फोटो व्हायरल केले. अखेर पोलिसांनी १२ तासांत अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या कारशेडमध्ये ते असल्याची माहिती मिळताच त्या मुलांना ताब्यात घेऊन सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले.

Web Title: The missing children were found within twelve hours