हरविलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST2021-08-19T04:44:04+5:302021-08-19T04:44:04+5:30

मुंब्रा : येथील हरविलेल्या १४ वर्षांच्या राहुल यादव याचा लोकलमधून पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तो ...

Missing child dies in accident | हरविलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू

हरविलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू

मुंब्रा : येथील हरविलेल्या १४ वर्षांच्या राहुल यादव याचा लोकलमधून पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तो येथील संजयनगरच्या गावदेवी परिसरातील शिवगर्जना चाळीत राहत होता. १६ ऑगस्टला तो हरवला होता. तेव्हापासून सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांतून त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. मंगळवारी त्यांचे वडील चौकशी करीत आरपीएफच्या कार्यालयात गेले असता तेथील पोलिसांनी सोमवारी (दि. १६) मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील मुंबईच्या दिशेच्या दुसऱ्या बोगद्याजवळ एका मुलाचा लोकलमधून खाली पडून मृत्यू झाल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर त्याचे वडील मृतदेह ठेवलेल्या ठाण्यातील शासकीय रुग्णालयात गेले असता, तो मृतदेह राहुल याचा असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Missing child dies in accident