शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मोहरमनिमित्त भिवंडीमध्ये निघाल्या मिरवणुका;  विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:37 AM

२९ पंजे, ६८ ताजीयांची स्थापना, ढोलताशे वाजवून केले जागरण

भिवंडी : मोहरमनिमित्त शहरातील विविध भागात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांची मंगळवारी मिरवणूक काढून त्यांचे विसर्जन करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी सोमवारी रात्रीपासूनच ढोलताशे वाजवून जागरण करण्यात आले. तर काही ठिकाणी धार्मिक कार्यक्र म करण्यात झाले.

शहरातील भोईवाडा परिसरातील शिया पंथीयांनी हैदर मशीदमध्ये सकाळपासून धार्मिक कार्यक्र म सुरू होते. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो शिया मुस्लिमांनी गर्दी केली होती. दुपारी हैदर मशीद ते दर्गारोडवरील कोतवाल शहा दर्गापर्यंत मिरवणूक काढून ही मिरवणूक नंतर विसर्जित करण्यात आली. या मिरवणुकीसाठी जमलेल्या नागरिकांमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. करमणुकीच्या साधनांबरोबर खेळण्यांची दुकानेही येथे थाटण्यात आली होती.

शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात गणेशोत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूने निघालेल्या मिरवणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मोहरमनिमित्त शहरातील पॉवरलूम उद्योग बंद होते. त्यामुळे कामगारांनी आजचा दिवस आपल्या कुटुंबासह आनंदात घालविला. दुपारनंतर शांतीनगर भागातील पिराणीपाडा येथील इराणी बांधवांनी मोहरमनिमित्ताने मिरवणूक काढून आपल्या अंगावर मारून व जखमा करून दु:ख व्यक्त केले. तर गैबीनगर येथून सायंकाळी निघालेला मोठा ताजीयाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ही ताजीयाची मिरवणूक व इराणी बांधवांची मिरवणूक एसटी स्थानकासमोरील चव्हाण कॉलनीत समारोप होऊन तेथे पंजा व ताजीया थंड करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी ताजीयाच्या मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.