शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड जलकुंभ उद्घाटन राड्याप्रकरणी सेना नगरसेविकेपाठोपाठ भाजपा नगरसेविकेची तक्रार, सेना नगरसेविकेसह 10 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 12:34 IST

गुढीपाडव्या दिवशी मीरारोडच्या शांती नगर भागात पालिका जलकुंभाच्या उद्घाटनावरुन शिवसेना नगरसेविकेस मारहाणप्रकरणी भाजपाच्या ४ नगरसेविकांसह एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपा नगरसेविकेच्या तक्रारीवरुन शिवसेना नगरसेविकेसह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मीरारोड - गुढीपाडव्या दिवशी मीरारोडच्या शांती नगर भागात पालिका जलकुंभाच्या उद्घाटनावरुन शिवसेना नगरसेविकेस मारहाणप्रकरणी भाजपाच्या ४ नगरसेविकांसह एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपा नगरसेविकेच्या तक्रारीवरुन शिवसेना नगरसेविकेसह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शांती नगर सेक्टर 2 मधील जलकुंभाचे उद्घाटन महापौर डिंपल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते उद्घाटनाचा प्रचार पत्रकं व सोशल मीडियावर भाजपाने केला. तर स्थानिक शिवसेना नगरसेविका दीप्ती भट यांनी पूर्वीपासून आपण पाठपुरावा केल्याचा सोशल मीडियावर प्रचार करत तसा फलक लावला होता. भाजपाच्या तक्रारी वरुन फलक काढायला लावल्या वरुन सुरू झालेल्या वादात प्रकरण हातघाईवर गेले.सेना नगरसेविका भट यांच्या अंगावर ओबाडल्याच्या खुणा व मुका मार लागल्याने त्याांना पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नया नगर पोलिसांनी या प्रकरणी भट यांच्या जबानी नंतर भाजपाच्या नगरसेविका हेतल परमार, रुपाली मोदी,वंदना भावसार, सीमा शाह सह माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी व पदाधिकारी राधा नाडर या ६6 जणांविरोधात दंगल, मारहाण आदी कलमां खाली गुन्हा दाखल केला.तर सोमवारी (19 मार्च) सायंकाळी भाजपा नगरसेविका हेतल परमार यांच्या फिर्यादी वरुन सेना नगरसेविका भट यांच्यासह उपजिल्हा संघटक स्नेहल सावंत, वर्षा कोटा, भावना पारेख, माला आचरेकर, प्राची पाटील, रेश्मा डोळस, जया गुप्ता, राजेश परब व झनक पंड्या अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील झनक यांनी असभ्य वर्तन केल्याची परमार यांची तक्रार असल्याने त्यांच्यावर विनयभंगाचे कलम लावण्यात आले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा