शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोड : शाळेवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुलांसहीत महिलेचं मनपा मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 14:47 IST

मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी म्हणुन आपल्या दोन्ही मुलांसह आज बुधवारी महापालिका मुख्यालया बाहेर पालक महिलेने धरणे धरले.

मीरा रोड - मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी म्हणून आपल्या दोन्ही मुलांसह  बुधवारी महापालिका मुख्यालयाबाहेर पालक महिलेने धरणे धरले. कम्युनिस्ट पक्षानेदेखील पालकास पाठिंबा दिला. तर शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला असून सदर दोन्ही मुलांना अन्य शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिल्यानंतर धरणं आंदोलन मागे घेतले.मीरा रोडच्या शितल नगरमधील कॉस्मोपोलिटीन शाळेत शिकणा-या निशाद शेख या महिलेच्या पहिली इयत्तेतील आसिफ व तिस-या इयत्तेतील आयशा या दोन मुलांना शाळेतून मनमानीपणे काढून टाकले होते. निशाद यांनी मनमानी शुल्क आकारणीबद्दल शाळेच्या व्यवस्थापना विरुद्ध पुढकार घेतल्याने दोघांमध्ये वाद होते. शाळेच्या फिर्यादीवरुन निशाद विरुद्ध मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल झाला.दरम्यान शाळा व पालक यांच्या वादात आसिफ व आयशा या दोन विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आल्याने संताप व्यक्त होत होता. निशाद यांनी बचाव समितीच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर उपसंचालक डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दोन वेळा मुलांना प्रवेश द्या म्हणून पत्रं देऊन देखील शाळेने त्यास केराची टोपली दाखवली. तर प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी देखील ठोस कार्यवाही केली नाही. लोकमत ने या बाबतचे वृत्त दिल्यावर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दखल घेत देशमुख यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच शाळेवर कारवाई व्हावी, यासाठी  बुधवारी निशाद यांनी आपल्या दोन्ही मुलांसोबत पालिका मुख्यालया बाहेर धरणं धरलं. भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेदेखील निशाद यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत धरण्यात सहभाग घेतला. वकील किशोर सामंत यांनी पालिकेला पत्रं देऊन दोन्ही मुलांना शाळेत प्रवेश द्यावा, शाळेची मान्यत रद्द करावी व आरटीई कायद्याची शहरात सक्तीने अमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली.दरम्यान आंदोलकांशी उपायुक्त दीपक पुजारी यांनी चर्चा केली. प्रशासन अधिकारी देशमुख कामानिमित्त बाहेर असून त्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. तसेच दोन्ही मुलांना अन्य शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालिका सहकार्य करेल, असे आश्वासन पुजारी यांनी दिले. गुरुवारी देशमुख आले की त्यांच्या सोबत एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ असे देखील पुजारी यांनी पालक व आंदोलकांना सांगितले. उपायुक्तांच्या आश्वासनानंतर धरणं आंदोलन मागे घेतल्याचे निशाद म्हणाल्या.

टॅग्स :Schoolशाळा