शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: रशियात नोकरी देतो सांगून दोघा भावांना फसवले   

By धीरज परब | Updated: October 19, 2023 18:25 IST

Mira Road Crime News: रशिया मध्ये वेटर आणि हेल्परची नोकरी देतो सांगून दोघा भावांना ४ लाख ३० हजार रुपयांना फसवल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . आरोपीने व्हिसा , विमान तिकीट सुद्धा बनावट बनवले होते.

मीरारोड - रशिया मध्ये वेटर आणि हेल्परची नोकरी देतो सांगून दोघा भावांना ४ लाख ३० हजार रुपयांना फसवल्या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . आरोपीने व्हिसा , विमान तिकीट सुद्धा बनावट बनवले होते.

नवी मुंबई , बेलापूरच्या अक्रोली गावात राहणाऱ्या ओमप्रकाश गुप्ता (२८) आणि मावसभाऊ मनोजकुमार गुप्ता ( ३२) हे बिगारी काम करतात . ऑगस्ट २०२२ मध्ये ओमप्रकाश याला ऑनलाईन सर्च करताना रशियात वेटर , हेल्परची नोकरीची जाहिरात दिसली . त्यात व्हॉइस व्हिडीओ वर  नोकरीसाठी येणार खर्च आदींचे दर पत्रक सांगितले होते . सव्वा दोन लाख प्रत्येकी खर्च दिला होता . त्या क्रमांकावर संपर्क केला असता संजय विश्वकर्मा याने सांगितल्या नुसार व्हिसा एक्स्पर्ट मॅन पावर रिक्वायरमेंट कंपनीच्या भाईंदरच्या गोडदेव , मीनाक्षी बिल्डिंग मधील पत्त्यावर दोघांनी पासपोर्ट पाठवले .

काही दिवसात विश्वकर्मा याने व्हॉट्सएप वर विमानाचे तिकीट , रशियाचा वर्क व्हिसा ओमप्रकाश ला पाठवले . दोघांनी विश्वकर्मा याला ४ लाख ३० हजार इतकी रक्कम भरली . रशियात नोकरी मिळाल्याच्या आनंदात दोघे व कुटुंबीय होते . विश्वकर्मा याने चेन्नई विमानतळावरून विमान असल्याचे सांगितल्याने दोघे विमान पकडण्यासाठी गेले असता त्यांचे तिकीट नकली असल्याचे तसेच रशियाचा व्हिसा बनावट असल्याचे आढळून आले . विश्वकर्माने त्याचा मोबाईल सुद्धा बंद केला . फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने ओमप्रकाश याच्या फिर्यादी वरून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे .  वरिष्ठ निरिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर