शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: धारावी किल्ल्यात गडप्रेमींनी गांजा बाळगणाऱ्यास पकडले 

By धीरज परब | Updated: July 18, 2023 15:12 IST

Crime News: भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ले परिसरात मद्यपान, अमली पदार्थ सेवन, धूम्रपान सुरूच आहे . पोलिसांना काही सापडत नसले तरी किल्ला प्रेमींनी गांजा बाळगणाऱ्यास पकडून दिले आहे.

मीरारोड - भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ले परिसरात मद्यपान, अमली पदार्थ सेवन, धूम्रपान सुरूच आहे . पोलिसांना काही सापडत नसले तरी किल्ला प्रेमींनी गांजा बाळगणाऱ्यास पकडून दिले आहे.

धारावी किल्ल्यावर चालणाऱ्या मद्यपान, धूम्रपान व गांजा सेवनाच्या प्रकारांची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत पोलीस व महापालिकेस आदेश दिले आहेत . या ठिकाणी पालिकेने सीसीटीव्ही बसवले मात्र त्याचे नियंत्रण ठेवले जात नाही . तसेच कांदळवन तोड प्रकरणी पोलिसांनाफुटेज मिळाले कि नाही ? हे अजून समजलेले नाही . या ठिकाणी कोणी सुरक्षा रक्षक वा पोलीस नसल्याने परिसरात उघडपणे व्यसनींचा अड्डा रंगत आहे.

धारावी किल्ला संवर्धन समितीचे कार्यकर्ते असलेले विशाल जाधव , विनोद देसाई , उल्हास खंडेराव , सतीश दरजी हे रविवारी रात्री  पाहणी साठी आले असता त्यांना दोघेजण संशयास्पद सापडले . त्यांनी कळवल्या वरून समितीचे रोहित सुवर्णा यांनी पोलिसांना कळवले . उत्तन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुणाल कुरेवाड हे पोलिसांसह घटनास्थळी आले असता त्यापैकी यग्याक ग्यानेश श्रीवास्तव ( २५ ) याच्या कडे ६० ग्राम गांजा मिळून आला . त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या ठिकाणी मद्यपी - गर्दुल्ले यांचा राबता सुरूच असून पोलीस बंदोबस्त ठेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी सुवर्णा यांनी केली आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोड