शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मीरा भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचे ६ कोटी ३० लाख मिळणार 

By धीरज परब | Updated: April 4, 2023 12:21 IST

मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवर १४६८ पदे भरलेली आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगा नुसार थकबाकीचा दुसरा हप्ता म्हणून ६ कोटी ३० लाख ७३ हजार इतकी रक्कम पालिका तोजोरीतून दिली जाणार आहे. 

मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवर १४६८ पदे भरलेली आहेत. अधिकारी व कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला असून ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन सरकारने त्यास मान्यता दिली होती .  त्यानुसार अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाबाबत अतिप्रदान झाल्याबाबतचे हमीपत्र घेण्यात आले व ऑक्टोबर २०२० पासून त्यानुसार वेतन अदा करण्यात येते.

७ वा  वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेय थकबाकीची रक्कम पुढील ५ वर्षात ५ समान हफ्त्यात नविन परिभाषित अंशदान कर्मचाऱ्यांना रोखीने व भविष्य निर्वाह निधीमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये देण्यासाठी पहिला हप्ता २०२१ सालात जमा करण्यात आला होता . पहिल्या हप्त्याची रक्कम हि ५ कोटी ८१ लाख ४३ हजार ६९० इतकी होती. मध्यंतरी पालिकेच्या तिजोरीत चणचण भासल्याने दुसरा हप्ता गेल्यावर्षी अपेक्षित असताना मिळाला नव्हता . यंदा पालिकेची चांगली मालमत्ता कर वसुली तसेच मुद्रांक शुल्कच्या फरकाची रक्कम आल्याने आयुक्त दिलीप ढोले यांनी ७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. 

सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना ५ कोटी ८१ लाख ४३ हजार इतकी  दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळणार असून ती त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होणार आहे . तर निवृत्त वेतनधारकांना ४९ लाख २९ हजार ८१६ इतकी रक्कम रोखीने दिली जाणार आहे . सुमारे १२०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून २००५ पूर्वी सेवेत दाखल झालेल्याच्या भविष्य निर्वाह निधी मध्ये रक्कम जाणार आहे अशी माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली. ७ व्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता मिळणार असल्याने अधिकारी - कर्मचारी खुश झाले आहेत . त्यामुळे ते अधिक प्रामाणिकपणे काम करतील अशी अपेक्षा जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक