शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेची 'माझे घर माझ्या २ कचरा कुंड्या' मोहीम 

By धीरज परब | Updated: October 24, 2022 17:40 IST

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत ओला व सुका कचरा हा वेगळे करणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक करण्यात आले आहे.

मीरारोड - ओला व सुका कचरा वेगळा करणे प्रत्येक नागरिकास कायद्याने  बंधनकारक असून कचरा वर्गीकरण केल्यास त्याचे शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे सोपे जात असल्याने मीरा भाईंदर महापालिकेने शहरात माझे घर माझ्या दोन कुंड्या अशी मोहीम सुरु केली आहे . 

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत ओला व सुका कचरा हा वेगळे करणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक करण्यात आले आहे. कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली असून उत्तन येथे तर कचरा प्रक्रिया न केल्याने कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. कचऱ्या मुळे तेथील शेती नष्ट झाली असून पाणी सुद्धा प्रदूषित झाले आहे . नियमित लागणाऱ्या आगी व दुर्गंधी मुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा संताप स्थानिकांनी सातत्याने व्यक्त केला आहे. 

महापालिका प्रशासनाने सातत्याने नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची आवाहन केले आहे . अनेकवेळा कचरा वर्गीकरण केला नसेल तर तो न उचलण्याची कार्यवाही केली गेली आहे . ओला व सुका कचरा वेगळा न केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद आहे . ओला कचरा वेगळा केल्यास त्या पासून खत आदी निर्मिती करता येते.  तर सुक्या कचऱ्या पासून जळाऊ इंधन बनवण्या सह विविध प्रक्रिया करता येते. 

नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा यासाठी प्रत्येकाने घर , दुकान , हॉटेल , फेरीवाला वा अन्य व्यवसाय ठिकाणी कचऱ्याचे दोन स्वतंत्र डबे ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे . ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात तर सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात गोळा करावे .  आपल्या शहरात घन कचरा व्यवस्थापन मोहीम यशस्वी करण्या करीता नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्या घरातील ओला आणि सुका कचऱ्याच्या, हिरव्या आणि निळ्या रंगाचा कुंड्या सोबत फोटो काढून जास्तीत जास्त सोशल मीडियावर पोस्ट करावे. त्यासाठी पालिकेने हरागिला सुकानीला एमबीएमसी आदी हॅशटॅगचा वापर करावा असे आवाहन नागरिकांना केल्याचे उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले . ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक