शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका एक खिडकी योजना सुरू करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:39 IST

एक खिडकी योजनेत संबंधित प्रभागातील सर्व गणेश मंडळांना मंडपापासून सर्व आवश्यक परवानग्या महानगरपालिका, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस तसेच अग्निशमन दला मार्फत देण्यात येणार आहेत.

मीरारोड - शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून मीरा भाईंदर महानगरपालिका सर्व ६ प्रभाग कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करणार आहे. १९ ऑगस्ट रोजी महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व प्रभागाचे प्रभाग अधिकारी, पोलीस प्रशासन यांची सार्वजनिक गणेशोत्सव बाबत बैठक आयोजित केली होती. 

त्यात मंडळांना सार्वजनिक श्रीगणेश उत्सवासाठी महानगरपालिका, पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशमन दलाची परवानगी घेणे बंधनकारक असून परवानगी शिवाय मंडप आदी कामे कोणी करत असेल, तर तत्काळ कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मंडळांच्या परवानगीकरीता वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ होऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या सर्व १ ते ६ प्रभाग समितीच्या कार्यालयात  एक खिडकी योजना सुरू करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकारी यांना आयुक्तांनी दिले. 

एक खिडकी योजनेत संबंधित प्रभागातील सर्व गणेश मंडळांना मंडपापासून सर्व आवश्यक परवानग्या महानगरपालिका, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस तसेच अग्निशमन दला मार्फत देण्यात येणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगीकरीता संबंधित प्रभाग कार्यालयात अर्ज  करायचा आहे.

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार सर्वांनीच करायचा असून कोरोना नियमांचे पालन करून घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकGaneshotsavगणेशोत्सव