शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलुन मीरा भाईंदर महापालिकेचा भरती घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 13:21 IST

महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी हे पद ठोक मानधनावर भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत ठोक मानधनावर औषध निर्माण अधिकारी नेमताना शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे निर्देश डावलुन पद भरल्याचे समोर आले आहे. त्यातच सदर पदावर पात्र ठरवलेल्या उमेदवार ह्या पालिकेच्या मुलाखत घेणाराया एका वैद्यकिय अधिकारायाच्या नातलग असल्याने हा निवड घोटाळा केला गेल्याचा आरोप होत आहे.शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक आयुक्तांच्या ५ जुन २०१४ रोजीच्या आदेशा नुसार कंत्राटी पदे भरते वेळी अनुभवा बाबत फक्त शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गतचा अनुभव ग्राह्य धरला जावा असे स्पष्ट केलेले आहे. तसेच औषध निर्माण अधिकारी आदी पदांसाठी मुलाखत १०० गुणांची असेल व कोणत्या गोष्टीसाठी किती गुण असावेत याचा तक्ताच नमुद केलेला आहे. ९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या आरोग्य सेवा संचालकांच्या पत्रात देखील शासकिय सेवेत काम केलेल्यास प्राधान्य दिले जावे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे.महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी हे पद ठोक मानधनावर भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली. त्यात मुलाखत किती गुणाची असेल ? कोणत्या विषयासाठी किती गुण असतील आदी माहितीच दिली गेली नाही. निवडीच्या प्राधान्य अर्हता मध्ये देखील शासकिय सेवेतील कामाच्या अनुभवास प्राधान्य असे सोयीस्कर टाळत केवळ कामाचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली. १८ फेब्रुवारी रोजी मुलाखत घेतेवेळी प्रत्यक्षात ५० गुणांचीच परिक्षा घेतली.या मुलाखतीमध्ये औषध निर्माण अधिकारी या पदासाठी सोनाली दत्तात्रय वराडे यांची निवड करण्यात आली. ५० गुणां पैकी २८.४७ गुण देण्यात आले. त्यातही अनुभवासाठीचे ५ पैकी ५ गुण दिले गेले. वास्तविक सोनाली वराडे यांना कोणताही शासकिय सेवेतील कामाचा अनुभव नसताना त्यांना पैकीच्या पैकी गुण दिले गेले. मुलाखती वेळी निवड समितीचे अध्यक्ष डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यासह अन्य सदस्यां मध्ये पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बालनाथ चकोर हे उपस्थित होते. सदस्य निवड समितीचे आरोग्य सेवेचे उपसंचालक मात्र नव्हते.महत्वाचे म्हणजे औषध निर्माण अधिकारी पदावर निवड केली गेलेल्या सोनाली वराडे ह्या डॉ. बालनाथ चकोर यांच्या नातलग आहेत. वराडे ह्या डॉ. चकोर यांच्या नातलग असताना ते मुलाखत घ्यायला थांबले व गुण दिले. ज्या विभागातील हे पद भरले गेले त्या विभागाचे डॉ. चकोर हेच प्रमुख आहेत. एकुणच डॉ. चकोर यांच्या नातलगाची वर्णी लागावी यासाठी शासनाचे निर्देश धाब्यावर बसवुन मुलाखत व निवडीचा संगनमताने सर्व खटाटोप केला गेल्याचा आरोप श्रमजीवी कामगार संघटनेने कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी केला आहे. सदर नियुक्ती रद्द करुन डॉ. चकोर सह संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पटेल यांनी केली आहे. डॉ. प्रमोद पडवळ यांनी मात्र, यात नातलगाचा विषय नाही, खाजगी सेवेचा अनुभव असला तरी नियुक्ती करता येते असे म्हटले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर