शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 11:53 IST

लसींचा तुटवडा असून पुरवठा सुरळीत होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे .

मीरारोड - ४५ वर्षां वरील नागरिकांचे ३ मे पर्यंत ४३ टक्के इतके लसीकरण करून मीरा भाईंदर महापालिका जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर आहे . लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास शहरातील नागरिकांचे लसीकरण  वेगाने पूर्ण करण्याची तयारी महापालिकेची आहे. मीरा भाईंदर महापालिकेची लोकसंख्या १० लाख ४७ हजार ३४६ इतकी गृहीत धरण्यात आली आहे . लसीकरण केंद्रांसाठी पालिकेची १२ तर खाजगी ९ लसीकरण केंद्र सुरु केली आहेत . आणखी २७ नवीन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार असून तसा मंजुरीचा प्रस्ताव पाठवला आहे . 

लसींचा तुटवडा असून पुरवठा सुरळीत होत नसल्याने लसीकरण मोहिमेवर त्याचा परिणाम होत आहे . तरी सुद्धा महापालिकेने ३ मे पर्यंत ४५ वर्षां वरील १ लाख ३५ हजार ४२३ नागरिकांचे पहिला डोस देऊन लसीकरण केले आहे . तर ३१ हजार ८८२ नागरिकांना लसीचा दुसरा डोस  आला आहे . शहरातील ४५ वयोगटा वरील नागरिकांची एकूण संख्या ३ लाख १४ हजार २०४ इतकी आहे . 

४५ वर्षां वरील ४३ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात मीरा भाईंदर महापालिका हि ठाणे जिल्ह्यातील अव्वल महापालिका आहे . नवी मुंबई महापालिकेत हेच प्रमाण ३८ टक्के ; ठाणे महापालिका २९ टक्के ; कल्याण डोंबिवली २२ टक्के ; उल्हासनगर १८ टक्के तर भिवंडी निजामपूर महापालिकेने केवळ ११ टक्के इतकेच लसीकरण केले आहे. 

१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असले तरी लसींचा पुरवठा नसल्याने भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातच लसीकरण सुरु आहे . ह्यात सुद्धा मीरा भाईंदर महापालिकेने ३ मे पर्यंत १२८६ नागरिकांचे लसीकरण केले आहे . ह्या वयोगटातील नागरिकांची संख्या ४ लाख ३९ हजार ८८५ इतकी आहे . लस मिळाल्यास अन्य केंद्र सुरु करता येणार आहेत . 

वैद्यकीय व अत्यावश्यक सेवेतील लसीकरणात सुद्धा महापालिकेने आघाडी घेतली आहे . १७ हजार २९७ कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर ८५४७ लोकांना दुसरा डोस दिला आहे . उद्दिष्टा पेक्षा जास्त लसीकरण केले आहे .  महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ . संभाजी वाघमारे , लसीकरण मोहिमेच्या प्रमुख डॉ . अंजली पाटील आणि लसीकरण केंद्रातील विविध कर्मचारी आदींच्या प्रयत्नांना मिळत असलेले यश मानले जात आहे. लसीकरण केंद्र व त्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि व्यवस्थेचे नियोजन महापालिकेने केलेले आहे . शासना कडून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यास नागरिकांचे वेगाने लसीकरण पूर्ण करता येईल असा विश्वास महापालिका प्रशासनाला आहे .

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस