शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मीरा भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 19:13 IST

मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. 

मीरारोड -  मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर‘मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड नागपूर तुपाशी मग मीरा भाईंदर का उपाशी’, मीरा भाईंदर मेट्रो कधी सुरु करणार’ अशा आशयाचे पोस्टर झळकावून आंदोलन केले. एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा भाईंदर मेट्रो साठी तरतूदच केली नसल्याचे वृत्त लोकमतने दिले होते . आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात, एमएमआरडीए च्या २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा उल्लेख व त्यासाठी तरतूद करण्यात आली नाही असे दिसुन आले . या मुळे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच मी या शहराचा आमदार या नात्याने मीरा भाईंदर शहरात मेट्रो यावी यासाठी गेल्या ७ ते ८ वर्षापासून पाठपुरावा करत असताना ठाणे ते दहिसरला जोडणारा दुवा म्हणून मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात येऊन त्याचे सर्वेक्षण हि पूर्ण झाले होते. 

परंतु असे असताना मेट्रोच्या कामाचे घोडे अडले कुठे असा सवाल आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करताना येत्या ६ महिन्यात मिरा भाईंदर शहरात मेट्रो येणार असल्याचे आश्वासन आपण दिले होते याची आठवणही यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.

    या सर्व प्रकारामुळे मीरा भाईंदर शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून लोक मेट्रोची उत्साहाने वाट पाहत असल्याने अधिवेशनाच्या याच आठवड्यात मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाबाबत घोषणा करून आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना एमएमआरडीए ला द्याव्यात अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे केली आहे. तसेच या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून मीरा भाईंदर मेट्रो कधी सुरु होणार अशी विचारणा केली.

टॅग्स :Metroमेट्रोMira Bhayanderमीरा-भाईंदर