शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मीरा-भाईंदर महापालिका ठेकेदाराच्या सर्वेक्षणात फेरीवाल्यांची संख्या तब्बल ७६७२

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 20:41 IST

मीरा-भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा आकडा तब्बल ७ हजार ६७२ इतकी असल्याचा महापालिकेने नेमलेल्या खासगी ठेकेदाराच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे.

मीरा रोड - मीरा-भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा आकडा तब्बल ७ हजार ६७२ इतकी असल्याचा महापालिकेने नेमलेल्या खासगी ठेकेदाराच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आला आहे. फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच फेरीवाला समितीमध्ये मान्यतेनंतर यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे फेरीवाला संघटनांनी सदर सर्वेक्षणाबद्दलच शंका उपस्थित केली असल्याने सदर सर्वेक्षण वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.मीरा-भाईंदरमधील फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेने मँगो इंटरप्रायझेस या ठेकेदारास कंत्राट दिले होते. प्रती फेरीवाल्याच्या सर्वेक्षणासाठी ११४ रुपये शुल्क पालिका ठेकेदारास अदा करणार आहे. मार्च २०१९ पासून ठेकेदाराने मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण सुरू करून ते नोव्हेंबरमध्ये पूर्ण केले. फेरीवाल्यांकडून त्याचे आधार कार्ड व शिधावाटप पत्रिका पुरावा म्हणून घेण्यात आले आहे. आधार कार्डशी लिंक होत नसेल तर बायोमॅट्रिक यंत्राच्या सहाय्याने फेरीवाल्याच्या बोटांचे ठसे घेऊन आधारशी जोडण्यात आले आहे.फेरीवाल्याच्या बसण्याच्या जागेचे जिओ लोकेशन घेण्यात आले आहे. ७ हजार ६७२ फेरीवाल्यांची नोंदणी अ‍ॅपद्वारे करून त्याची माहिती थेट राज्य शासनाच्या पोर्टलला अपलोड केली गेली आहे, असे या सर्वेक्षणाशी संबंधित समन्वयकाकडून सांगण्यात आले. यातील सुमारे ३ हजार फेरीवाल्यांनी कागदपत्रे जमा केली आहेत. आधारशी लिंक व शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड झाल्याने एकाच फेरीवाल्याची दोन वेगळ्या ठिकाणी नोंदणी होणार नसल्याचे सांगण्यात आले.सर्वेक्षणात आढळून आलेल्या फेरीवाल्यांची तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यातील पात्र फेरीवाले ठरवले जाणार आहेत. परंतु सदर सर्वेक्षण करताना अनेक त्रुटी आणि गैरप्रकारांचे आरोप आझाद हॉकर्स युनियन आदी फेरीवाल्यांच्याच संघटनांनी केले होते. एखाद्या भागातील सर्वेक्षणाची माहिती आधीच दिली गेल्याने फेरीवाल्यांना बसवून नोंदणी करून घेतल्याच्या तक्रारी आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार १ मे २०१४ पर्यंतचे फेरीवाले पात्र असून, त्यांचा सक्षम पुरावा पडताळणी करून मगच त्यांना पात्र ठरवले गेले पाहिजे, असे युनियनचे जय सिंह यांनी सांगितले. पालिका, काही लोकप्रतिनधी, बाजार वसुली ठेकेदार आदी संबंधितांच्या संगनमताने या सर्वेक्षणात बोगस नोंदणीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.महत्त्वाचे म्हणजे सर्वेक्षण आहे म्हणून फेरीवाला बसला आहे का ? असा प्रश्न असून आठवडे बाजारात बसणा-या फेरीवाल्यांच्या नोंदी देखील केल्या गेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर तर शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळ, रुग्णालय पासून १०० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असताना त्या मनाई क्षेत्रात बसणा-या फेरीवाल्यांची देखील नोंद केली गेली आहे.मीरा भाईंदरमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, पालिकेने केलेली तात्पुरती मार्केट भलत्याच फेरीवाल्यांना बसवण्यासह अवास्तव शुल्क वसुलीमुळे वादग्रस्त ठरली आहे. त्यातच फेरीवाल्यांची संख्या वाढवण्यामागे बाजार वसुली करणा-या ठेकेदारांचे राजकीय लागेबांधे असल्याचे आरोप सतत होत आला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण आणि पडताळणी भविष्यात वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. जुन्या फेरीवाल्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजेच, पण इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या फेरीवाल्यांचे नियोजन कसे करणार हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.