शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर मेट्रोचा अखेर श्रीगणेशा;  ठाणे, मुंबईला जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:33 IST

मेट्रोच्या कंत्राटदाराकडून भू-तांत्रिक तपासणीचे काम सुरू

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरांतील नागरिकांच्या बहुप्रतीक्षित अशा मेट्रोच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ऐन गणेशोत्सव काळात मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. रस्त्यावर बॅरिगेट्स लावून खोदकामाला सुरुवात झाल्याने येणारी विधानसभा निवडणूक पावली की गणपती बाप्पा पावला, अशी खुमासदार चर्चाही नागरिकांमध्ये रंगली आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकीवेळी मीरा-भार्इंदरला मेट्रो मंजूर केल्याची घोषणा झाली. निवडणुकीत भाजप-शिवसेनेने त्याच्या श्रेयाचा प्रचारही केला. पण, ‘लोकमत’ने मात्र मेट्रोसाठी एमएमआरडीएने अंदाजपत्रकात तरतूदच केली नसल्याचे तसेच त्यांच्या संकेतस्थळावरही मेट्रोचा लवलेश नसल्याचे उघड केल्यानंतर श्रेय घेणाऱ्या सत्ताधारी भाजपची चांगली गोची झाली. सामाजिक संघटनांसह अन्य राजकीय पक्षांनीही महासभेत तसेच बाहेरही जाब विचारत आंदोलने केली. शिवसेनेने तर दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री अशा सणांना मेट्रोसाठी आंदोलने केली.

काही महिन्यांनी दहिसर पूर्वेतून भाईंदर अशा मेट्रोमार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर आर्थिक तरतूद तसेच निविदा प्रक्रिया सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले गेले, पण काम मात्र काहीच सुरू होत नव्हते. आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन १५ आॅगस्टपर्यंत कामास सुरुवात करा, अशी मागणी केली होती. पण, आॅगस्टअखेरीस काम सुरू करण्याचे आदेश त्यांना दिले होते.

मीरा-भाईंदर मेट्रोच्या मार्गावर सोमवारी कामाला सुरु वात झाली आहे. काशिमीरानाका, झंकार कंपनी, साईबाबानगर, दीपक रुग्णालय येथे कामाला सुरु वात झाली आहे. या कामासाठी बॅरिगेट्स लावले आहेत. तीन ठिकाणी भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे, असे सांगत खºया अर्थाने मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

मीरा-भाईंदरला मेट्रोने जोडावे, अशी मागणी आ. सरनाईक यांनी २००९ पासून शासनाकडे सातत्याने केली असून तत्कालीन आमदार मुझफ्फर हुसेन, तत्कालीन खासदार संजीव नाईक, खासदार राजन विचारे, तत्कालीन महापौर गीता जैन यांच्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनीही मेट्रोची मागणी केली होती. मेट्रोसाठी शहरात विविध संघटनांनी मिळून आंदोलन उभारले होते. काँग्रेसने सह्यांची मोहीमही राबवली होती. ठाण्याची मेट्रो काशिमीराच्या शिवाजी महाराज चौकात दहिसर-मीरा-भार्इंदर मेट्रोला मिळणार आहे. त्यामुळे आता थेट ठाणे व मुंबईला मेट्रोने जोडले गेल्याने रेल्वे तसेच रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होणार असल्याचे सरनाईक म्हणाले.भाईंदरपाडा, दहिसर येथे कारशेडजे. कुमार कंपनीला मेट्रोचे काम देण्यात आले असून मीरा-भार्इंदर मेट्रोसाठी सहा हजार ६०७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे ११ किमीचा मार्ग असणार आहे. त्यात दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशिगाव, साईबाबानगर, मेडतियानगर, शहीद भगतसिंग उद्यान, सुभाषचंद्र बोस मैदान अशी एकूण आठ स्थानके असणार आहेत. या मेट्रोमार्गासाठी भार्इंदरपाडा व दहिसर येथे कारशेड डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे.

टॅग्स :Metroमेट्रोMira Bhayanderमीरा-भाईंदर