शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर मनसेची कार्यकारिणी जाहीर; अंतर्गत धुसफूस कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 15:00 IST

आॅगस्टमध्ये बरखास्त केलेली मीरा-भार्इंदर मनसेची मुख्य तसेच महिला आघाडीची कार्यकारिणी नव्याने जाहीर करण्यात आली आहे.

मीरा रोड - आॅगस्टमध्ये बरखास्त केलेली मीरा-भार्इंदर मनसेची मुख्य तसेच महिला आघाडीची कार्यकारिणी नव्याने जाहीर करण्यात आली आहे. १९ जणांची मुख्य कार्यकारिणी, १७ विभाग अध्यक्ष तर १४ जणींची महिला आघाडीची कार्यकारिणी आहे. महिला आघाडीत एक उपजिल्हाध्यक्ष व दोन शहर अध्यक्ष केले आहेत. नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असली तरी अंतर्गत धुसफूस मात्र कायम असल्याचे समजते.मीरा-भार्इंदर मनसे संघटनात्मक व नेतृत्वाच्या दृष्टीने कमकुवत असताना अंतर्गत वादविवाद सुद्धा टिपेला पोहोचले आहेत. एखादा विषय घेण्यावरून सुद्धा वाद होत आले आहेत. तर शहरात अनेक गंभीर समस्या असताना असे विषय टाळण्यासह घेतलेल्या विषयांचा पाठपुरावा करून ते तडीस लावले जात नाहीत. सत्ताधा-यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात नाही. मोकळेपणाने काम करू दिले जात नाही अशा तक्रारींचा सूर मनसैनिकांकडूनच सुरू आहे. या वादातून मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजगढाच्या निर्देशानुसार आॅगस्टमध्ये मनसेची कार्यकारिणी बरखास्त केली होती.आता नव्याने मनसेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या सह १९ जणांची मुख्य कार्यकारिणी तर १७ विभाग अध्यक्ष नियुक्त केले गेले आहेत. हेमंत सावंत यांना भार्इंदर शहर संघटक, दिनेश कनावजे यांना मीरा रोड शहर संघटक तर शशी मेंडन यांना मीरा-भार्इंदर विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी बढती दिली आहे. सचीव पदी नरेंद्र पाटोळे यांची पुन्हा वर्णी लागली आहे. भार्इंदर पश्चिमेसाठी उप शहराध्यक्षपदासाठी कोणीच सक्षम नसल्याने ते रिक्त ठेवले आहे. तर प्रमोद देठे, सतीश जाधव व नागेश कासार यांनी मात्र सह सचिवपद नाकारले आहे.महिला आघाडी उप जिल्हाध्यक्ष पदी पुत्तुल अधिकारी यांना नियुक्त केले आहे. दोन शहर अध्यक्षा केल्या असून, अनू पाटील यांना ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्र तर सोनिया फर्नांडिस यांना मीरा-भार्इंदर विधानसभा क्षेत्र दिले आहे.

टॅग्स :MNSमनसे