शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरचे पाणी महागले; प्रतिहजार लीटर पाण्यासाठी १३ रुपये निवासी तर ५० रुपये व्यावसायिक दर मोजावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 20:23 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या विशेष महासभेत प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्याच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता दिली.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या विशेष महासभेत प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्याच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता दिली. त्यामुळे निवासी दर १० रुपयांवरून १३ रुपये तर व्यावसायिक दर ४० रुपयांवरून ५० रुपये प्रति १ हजार लीटर पाण्यासाठी मोजावा लागणार आहे.पालिकेला स्टेम कंपनीकडून ८६ व एमआयडीसीकडून ९० असा एकूण १७६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्याच्या देयकापोटी स्टेम व एमआयडीसीला प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्याकरिता अनुक्रमे १० रुपये ९५ पैसे व ९ रुपये दर पालिकेला मोजावा लागतो. तसेच पाण्यासाठी रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर व महावितरण कंपनीला पंपिंगच्या वीजपुरवठ्यासाठी लाखोंचा खर्च अदा करावा लागतो. यामुळे पालिकेला पाणीपट्टीतून गतवर्षी ६८ कोटी १७ लाख ७२ हजारांचे उत्पन्न मिळाले असून, खर्च मात्र १६६ कोटी ४२ लाख ६१ हजार रुपये इतका करण्यात आला आहे. यावरुन पाणीपट्टीद्वारे पालिकेला मिळणारे उत्पन्न त्यावर होणा-या खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने पालिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागतो. पालिकेला प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्यासाठी एकूण १४ रुपये ५० पैसे खर्च येत असला तरी नागरिकांना मात्र १० रुपये दरानेच पाणी वितरीत केले जाते. यात पालिकेला साडेचार रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने वर्षाकाठी त्यात कोट्यवधींचा निधी खर्ची घातला जातो. त्यातच पालिकेला एमएमआरडीएमार्फत ११८ व जलसंपदा विभागामार्फत १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा सूर्या धरणातून मंजूर करण्यात आल्याने ही योजना एमएमआरडीएद्वारे राबविण्यात येणार आहे. ही योजना शहराच्या प्रवेशद्वारापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, योजना शहरांतर्गत पूर्ण करण्यासाठी पालिकेला मोठा निधी उभारावा लागणार असल्याने पालिकेचे उत्पन्न आवश्यक ठरले आहे. परिणामी वाढलेल्या उत्पन्नामुळे योजना पूर्णत्वावासाठी कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने पाणीपट्टीच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये प्रत्येकी १ हजार लीटर पाणीपुरवठ्यामागे वाढ करण्याचा ठराव भाजपाच्या गीता जैन यांनी मांडला मंगळवारच्या विशेष महासभेत मांडला. तत्पूर्वी १६ डिसेंबरच्या स्थायी समिती बैठकीत निवासी दरात २ व व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र महासभेत सत्ताधारी भाजपाने त्यात आणखी एक रुपयाची वाढ मंजूर केली तर व्यावसायिक दर जैसे थे ठेवला. त्यावर सेना व काँग्रेस या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. काँग्रेसचे अनिल सावंत यांनी पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने रितसर मांडलेला नसून तो सत्ताधा-यांकडून सादर करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेतला. तसेच पालिकेला मंजूर ७५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजनेतील २५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा अद्याप शहराला मिळत नसतानाही सत्ताधा-यांची प्रस्तावित पाणी दरवाढ रद्द करण्यात यावी, असा ठराव मांडला. त्यावर महापौर डिंपल मेहता यांनी दोन्ही ठरावांवर मतदान घेत जैन यांचा ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले.

टॅग्स :Waterपाणी