शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुक - हीच का पारदर्शकता? भाजपाचे २१ नगरसेवक गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:44 IST

मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ८१ उमेदवारांपैकी तब्बल २७ जण नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ८१ उमेदवारांपैकी तब्बल २७ जण नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. एकहाती सत्ता मिळवणाºया भाजपाच्या तब्बल २१ नगरसेवकांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेच्या ४ तर दोन पुरस्कृत नगरसेवकांसह एकूण १२ जागा जिंकणाºया काँग्रेसच्या २ नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत.मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात गुन्हे दाखल असलेले २५ उमेदवार भाजपाने दिले होते. त्यापैकी तब्बल २१ उमेदवार निवडून आले. भाजपाचे दरोगा उर्फ पंकज पांडेवर तब्बल ६ गुन्हे दाखल आहेत. पांडेला तडीपार करण्याचा प्रस्तावही पोलिसांनी पाठवला होता. भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे, गणेश शेट्टी, अ‍ॅड. रवी व्यास यांच्यावर प्रत्येकी ४ गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे प्रभाग ३ मधील नगरसेवक गणेश शेट्टी यांच्यावर खंडणी, अनैतिक देहव्यापार आदी गंभीर गुन्हे दाखल असून त्यांचाही तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी पाठवला होता.भाजपाच्या अशोक तिवारींवर ३ गुन्हे दाखल आहेत. भाजपाचे ध्रूवकिशोर पाटील व अश्विन कासोदरिया यांच्यावर प्रत्येकी २ गुन्ह्यांची नोंद आहे. पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर कासोदरिया वर शालेय मुलीचा विनयभंग व बालअत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. प्रभाग १२ मधील उमेदवार अरविंद शेट्टी हे लेडीज बार - लॉजचे चालक असून त्यांच्यावर अनैतिक देहव्यापार ( पीटा ) खाली गुन्हा दाखल आहे. भाजपाचे हसमुख गेहलोत व मोहन म्हात्रे वर जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४,५ खाली गुन्हा दाखल आहे. भाजपाने अशोक तिवारी व वर्षा भानुशाली या दोघांना लाच घेताना पकडलेल्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली. शिवाय ते निवडूनही आले आहेत.भाजपाचे परशुराम म्हात्रे, प्रशांत दळवी, विनोद म्हात्रे, सचिन म्हात्रे, मुन्ना सिंह, मनोज दुबे, दिपीका अरोरा, दौलत गजरे, रिटा शाह यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्यावरही २००७ मधील खटला प्रलंबित आहे. शिवसेनेचे जयंतीलाल पाटील, राजू भोईर, तारा घरत, अनिता पाटील तर काँग्रेसच्या रुबिना शेख व काँग्रेस पुरस्कृत अमजद गफार शेख यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.भाजपाच्या २१ पैकी तब्बल १४ नगरसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. तर शिवसेनेच्या ४ पैकी २ व काँग्रेस पुरस्कृत १ नगरसेवकावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात मात्र निवडणून येण्याची क्षमताच पाहिली जाते. त्यातही उमेदवारांवर गुन्हे दाखल असले तरी न्यायालयात सिध्द होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपीच असतात असा सोयीस्कर पवित्रा राजकारणी नेहमीच घेतात.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरBJPभाजपा