शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मीरा-भार्इंदर पाण्याखाली? बेकायदा भरावाकडे पालिकेची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:37 IST

मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे.

मीरा रोड   -  मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे. शहरात पाणी साचण्यासह पर्यावरणाचा मोठा ºहास होत असून या माफियांना काही लोकप्रतिनिधींसह विविध सरकारी यंत्रणांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आशीर्वाद असल्याने दिवसाढवळ्या व रात्री खुलेआम चालणाºया भरावास लगाम घातला जात नाही. पालिकेने नेमलेले मातीभरावविरोधी पथकही कूचकामी ठरले आहे.मीरा-भार्इंदर हे उत्तर व दक्षिणेस खाडीने वेढलेले आहे. तर, पश्चिमेस समुद्र असून पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची डोंगररांग आहे. पावसाळ्यात डोंगरांवरून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी हे नैसर्गिक ओढे-नाले व खाडीमार्गे बाहेर पडायचे. किनारपट्टी परिसरात व अंतर्गत असलेली पाणथळ, कांदळवनाचे जंगल, मिठागरे, सीआरझेड व नाविकास क्षेत्रही पावसाचे पाणी सामावून घेणारी व पाण्याचा निचरा होणारी नैसर्गिक अशी महत्त्वाची क्षेत्रे होती. मात्र, काही वर्षांपासून शहरातील या नैसर्गिक पावसाळी व भरतीचे पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकाराचा भराव, बांधकामास मनाई असतानाही सर्रास बेकायदा कचरा, दगड-माती व डेब्रिजचा भराव होत आहे. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह भराव व बांधकामांमुळे बंद झाले आहेत.याविरोधात ठोस भूमिका घेण्याऐवजी लोकप्रतिनिधी, महापालिका, महसूल, पोलीस व मीठ विभाग हे एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत. परिणामी, पावसाळ्यात डोंगरावरून येणाºया पाण्याच्या लोंढ्यामुळे काशिमीरा व परिसर पूर्ण जलमय करून पूरस्थिती निर्माण होते. अनेक भागांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना फटका बसत आहे. त्यातही पालिकेने या नैसर्गिक ओढे-खाड्यांना नाले ठरवत त्यांचे काँक्रिटीकरण चालवले आहे. बंदिस्त नाले प्लास्टिक, गाळाने तुंबत असताना त्यांची सफाई केली जात नाही.विविध प्रकल्पांमधून निघणारे दगड-माती, गाळ टाकण्यासाठी मीरा-भार्इंदर व वसई-विरार हे डम्पिंग यार्ड ठरले आहे. शिवाय, नाले, तलाव सफाई तसेच खाजगी कामातून निघणारी दगड-माती, गाळही पाणी साठवण्याच्या वा पाणी वाहून जाणाºया प्रवाहात टाकले जात आहे. डेब्रिजही सर्रास पाणथळ, कांदळवन भागात टाकले जाते. सरकारी जागेत चालणाºया भरावाकडेही कानाडोळा केला जात आहे. अर्थपूर्ण हित साध्य होत असल्याने माफियांचे थेट काही लोकप्रतिनिधी, पालिका, महसूल, मीठ विभाग व पोलीस यांच्याशी साटंलोटं असल्याच्या आरोपांना बळ मिळत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी माती व डेब्रिजचा भराव रोखण्यासाठी दोन पथके नेमली होती. यात मुकादमांसह स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश केला. त्यांना स्वतंत्र वाहने देण्यात आली. पथकाला भराव आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.बांधकामे होत असलेली ठिकाणेकनकिया, हाटकेश, नेमिनाथ हाइट्स - टाकी परिसर, काशिगाव परिसर, घोडबंदर, रेतीबंदर, वरसावे, एक्स्प्रेस ईन हॉटेलमागील परिसर, चेणे नदी, चेणे - काजूपाडा, माशाचापाडा - डाचकुलपाडा, महाजनवाडी, पेणकरपाडा, सृष्टी, मीरागाव परिसर, पूनम सागर - जाफरी खाडी, शांतीनगर, आरएनपी पार्क, जेसल पार्क, सरस्वतीनगर - शिवशक्तीनगर, नवघरगाव, इंद्रलोक, भार्इंदर पश्चिमेस उड्डाणपुलाखालील रेल्वे मार्गाजवळचा परिसर, राधास्वामी सत्संग व परिसर, नाझरेथ झोपडपट्टी, शास्त्री व नेहरूनगर, मुर्धा खाडी, रेव आगर, सदानंदनगर, मुर्धा बांध, राई - शिवनेरी, मोर्वा गाव व आरके क्रीडांगण परिसर, तारोडी ते चौक धक्का, डोंगरी ते कोपरा, उत्तन, भार्इंदर पश्चिम धक्का ते जय अंबे, गणेश देवल, बजरंगनगर, क्रांतीनगर.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक