शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हरीत मिरा भार्इंदरच्या वल्गना पोकळच, रोपांच्या संरक्षणासाठी लावलेल्या पिंज-यांची मोडतोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:04 IST

मीरा भार्इंदर महापालिकेचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करत लावलेल्या रोपांची व त्याच्या संरक्षणा साठी लावलेल्या लोखंडी पिंज-यांची सर्रास मोडतोड केली जात आहे.

मीरारोड - मीरा भार्इंदर महापालिकेचे पर्यावरण प्रेम बेगडी असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पालिकेने मोठा गाजावाजा करत लावलेल्या रोपांची व त्याच्या संरक्षणा साठी लावलेल्या लोखंडी पिंज-यांची सर्रास मोडतोड केली जात आहे. परंतु या कडे पालिका व लोकप्रतिनिधींचे लक्षच नसल्याचे दिसत आहे. वृक्षा रोपणाच्या नावाखाली केले जाणारे काही कोटी रुपयांचा खर्च या अशा प्रकारां मुळे फुकट जात असुन वृक्षांची वाढ होत नसल्याने हरीत मीरा भार्इंदरच्या केवळ भुलथापा ठरल्या आहेत.पावसाळा येणार त्या आधी महापालिकेने वृक्षा रोपणाची जोरदार तयारी केली आहे. रोपांची लागवड करताना महापौर, आमदार आदी पदाधिकारी , नगरसेवक तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी रोपांची लागवड करताना आवर्जुन छायाचित्र काढुन सोशल मिडीयावर कौतुक करुन घेत असतात.परंतु नंतर मात्र लावलेली रोपं, त्याच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी पिंजरे , रोपांना नियमीत पाणी व खत मिळतंय की नाही, रोपं जगली की नाही आदी बाबींकडे ढुंकुनही कोणी बघत नाहीत. परिणामी रोपं व पिंजरे भार्इंदर पोलीस ठाण्याच्या आवारात पडुन राहण्याच्या प्रकारा पासुन ठिकठिकांणी पिंजरे नसणे वा ते काढून नेणे, पाणी - खत नसल्याने रोपं सुकुन मरुन जाणे या सारखे प्रकार जागोजागी दिसुन येतात.भार्इंदर पुर्वेच्या इंद्रलोक - न्यु गोल्डन नेस्ट मार्गावर तर पालिका व लोकप्रतिनिधींनी मोठ्या दिमाखात लावलेल्या रोपांची व संरक्षण पिंजरयांची दुरावस्था झालेली आहे.पालिकेच्या ठेकेदाराच्या कचरयाच्या गाड्या वा अन्य वाहनं उभी करताना सर्रास या पिंजरयांची मोडतोड केली आहे. काही पिंजरे तर खाली पडले आहेत. पिंजरयांची मोडतोड झाली आहेच शिावाय यातील रोपांची सुध्दा हानी झालेली आहे. काही रोपं तर सुकुन गेली आहेत.वास्तविक महापालिकेने लावलेली रोपं, संरक्षित पिंजरे यांची काळजी घेण्याची जबाबदारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची आहेच. पण त्याच सोबत नगरसेवक, आमदार यांच्या सह राजकिय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सुध्दा आहे. परंतु वृक्षा रोपणा वेळी चमकोगीरी करणारी ही मंडळी राजरोसपणे होणारया पिंजरयांची मोडतोड व सुकणारया रोपां कडे मात्र ढुंकुनही पाहताना दिसत नाही.डॉ. संभाजी पानपट्टे ( उपायुक्त ) - त्वरीत अधिकारी पाठवुन माहिती घेऊ. रोपं व पिंजरयांचे झालेले नुकसान प्रकरणी कारवाई केली जाईल.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या