शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर : भाजपा-सेनेचे नगरसेवक दार्जिलिंग व नैनिताल दौ-यावर, पालिकेला माहितीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 22:26 IST

जनतेच्या पैशांनी नैनिताल व दार्जिलिंगच्या गेलेल्यांमध्ये भाजपाचे १७ तर शिवसेनेचे ५ नगरसेवकांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी गेल्याची माहिती हाती आली आहे.

मीरा रोड - जनतेच्या पैशांनी नैनिताल व दार्जिलिंगच्या गेलेल्यांमध्ये भाजपाचे १७ तर शिवसेनेचे ५ नगरसेवकांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी गेल्याची माहिती हाती आली आहे. तर प्रशासनाकडे मात्र दौ-यांवर गेलेल्या नगरसेवक व अधिकारी यांची माहिती विचारली असता अशी कोणती माहितीच संबंधित विभागाने दिली नसल्याचे जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.मीरा भार्इंदर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे १६ सदस्य असुन आयुक्त हे त्याचे अध्यक्ष आहेत. भाजपाच्या मीना कांगणे, निला सोन्स, डॉ. प्रीती पाटील, हेमा बेलानी, सुजाता पारधी, मनोज दुबे, सचीन म्हात्रे, गणेश भोईर, विनोद म्हात्रे व गणेश शेट्टी हे १० नगरसेवक सदस्य आहेत. शिवसेनेचे कमलेश भोईर, एलायस बांड्या व अनंत शिर्के तर काँग्रेसचे राजीव मेहरा व अमजद शेख हे नगरसेवक या समिती मध्ये आहेत.समितीच्या 12 एप्रिल रोजी नैनिताल, देहरादुन या पर्यटनस्थळीच्या दौ-यात काँग्रेसचे मेहरा व शेख तर भाजपाचे शेट्टी हे तिघे नगरसेवक गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेचे अधिकारी नागेश ईरकर, हंसराज मेश्राम आदींचा देखील दौरेबाजांमध्ये समावेश आहे. महिला बालकल्याणच्या दार्जिलिंग, गँगटोक येथील 11 एप्रिल रोजी गेलेल्या दौरयात भाजपाच्या शानु गोहिल, सीमा शाह, वंदना भावसार, नयना म्हात्रे, सुरेखा सोनार, वैशाली रकवी, दीपिका अरोरा, सुनिता भोईर शिवसेनेच्या अर्चना कदम, कुसुम गुप्ता या नगरसेविकांचा समावेश आहे. शिवायसोबत पालिकेचे गोविंद परब, दामोदर संख्ये व फ्रांसीस या अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.या दौ-याला काँग्रेसच्या सारा अक्रम, रुबिना शेख तर सेनेच्या हेलन गोविंद तर कौटुंबिक कारणामुळे भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे ह्या गेल्या नाहीत. भाजपाच्या रक्षा भुपतानी यांनी ऐन वेळी दौरा रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले. सेनेच्या कुसुम यांनी तर दौरे रद्द करा म्हणून एकीकडे पत्र देत दुसरी कडे मात्र त्या दौ-यास गेल्या आहेत.तर पालिकेच्या खर्चातून हे दोन्ही दौरे गेले असताना दौऱ्यांवर गेलेल्यांची नावंच पालिकेकडे नसल्याचं उघड झालं आहे. जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी आपल्याकडे नावं नसल्याचे सांगत संबंधित अधिकारी यांनी देखील माहिती दिली नाही असे स्पष्ट केले आहे. एकीकडे भाजपाने नागरीकांवर करवाढीचा बोजा टाकला तर सेनेने करवाढीस विरोध केला. परंतु पर्यटनस्थळी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करुन मौजमजा करण्यासाठी मात्र भाजपा व सेनेचे नगरसेवक एकत्र गेल्याने यांचा विरोध बेगडी आहे. पण मनसे या दौरेबाज नगरसेवकां विरुद्ध  आंदोलन करणार असे शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा