शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागाला मिळणार ६८ मीटर उंचीची टीटीएल; तब्बल १६ कोटींहून अधिक खर्चाचे वाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 19:38 IST

मीरा-भाईंदर महापालिकेने विकासकांना ७० मीटरहून अधिक उंचीच्या इमारती बांधण्याची परवानगी देण्यास काही वर्षांपूर्वीच सुरुवात केली आहे.

- राजू काळे  

भाईंदर - मीरा-भाईंदर महापालिकेने विकासकांना ७० मीटरहून अधिक उंचीच्या इमारती बांधण्याची परवानगी देण्यास काही वर्षांपूर्वीच सुरुवात केली आहे. या इमारतींच्या ४० मीटर उंचीपेक्षा वरील मजल्यावरील संभाव्य दुर्घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने यंदा तब्बल १६ कोटींहून अधिक किंमतीचे टिटीएल (टेबल टर्न लॅडर) वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या खरेदीचा प्रस्ताव ४ फेब्रूवारीच्या स्थायी समिती बैठकीत मान्यतेसाठी आणण्यात आला आहे. 

२००२ मधील पालिका स्थापनेनंतर प्रशासनाने ४५ मीटर उंचीच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी देणे सुरु केले. अग्निशमन विभागाकडून सुद्धा त्या उंचीपर्यंतच्या इमारतींना ना हरकत दाखला दिला जात होता. त्यावेळी सुमारे १० ते १२ मजली इमारतींच्या ८ मजल्यावरील दुर्घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाकडे पुरेशी व्यवस्था नसल्याने अग्निशमन विभागाला बचाव कार्यात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पालिकेने ३९ मीटर उंचीचे टिटिएल हे सुमारे ७ कोटींचे परदेशी बनावटीचे रेस्क्यू वाहन आॅस्ट्रीया देशातील मेसर्स रोझनबाऊर इंटरनॅशनल या कंपनीकडून २२ मे २०१२ रोजी खरेदी केले. या वाहनामुळे सुमारे १२ मजली इमारतींवरील दुर्घटनांवर नियंत्रण मिळविणे अग्निशमन विभागाला शक्य होऊ लागले. गेल्या दोन वर्षांपुर्वी पालिकेने ७० मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे १२ मजल्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवरील दुर्घटना नियंत्रण मिळविण्याचे आव्हान अग्निशमन विभागापुढे उभे राहिले होते. गेल्याच वर्षी काशिमीरा येथील एका १४ मजली इमारतीतील आग दुर्घटनेवेळी अग्निशमन दलाच्या ताफ्यात असलेली ३९ मीटर टिटीएल अपुरी पडल्याचे समोर आले. तत्पुर्वी २४ फेब्रूवारी २०१६ रोजीच्या महासभेत ६२ मीटरपेक्षा अधिक उंचीचे टिटीएल वाहन खरेदीस मान्यता देण्यात आली. ६२ मीटर खेरीज थेट ६८ मीटर उंच टिटीएल खरेदीच्या आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावालाच मान्यता देण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांची खरेदी केवळ एकाच कंपनीची निविदा प्राप्त झाल्याच्या तांत्रिक अडचणीत खोळंबली होती. अनेकदा निविदा काढूनही किमान ३ निविदाकारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा प्रशासनाने जर्मनी येथील मॅगीरस जीएमबीएच कंपनीच्या निविदेचाच स्विकार करण्यात आला.  या ६८ मीटर उंच टिटीएल रेस्क्यु वाहनाची मूळ किंमत तब्बल ११ कोटी ४५ लाख इतकी असुन त्याच्या ३ वर्षे वाढीव वॉरंटीपोटी वाहन खरेदी करतानाच पालिकेला १ कोटी ७६ लाख ५७ हजारांची रक्कम कंपनीला अदा करावी लागणार आहे. याखेरीज भार्इंदरपर्यंत आणण्यासाठी कस्टम क्लिअरन्स व वाहतुकीसाठी सुमारे ५ लाख २० हजार रुपये मोजावे लागणार आहे. याशिवाय ११ टक्के कस्टम ड्युटीपोटी सुमारे १ कोटी २६ लाख रुपये व १८ टक्के जीएसटी करीता २ कोटी ६ लाख रुपये सरकारी तिजोरीत भरावे लागणार आहेत. अंदाजे १६ लाख ५९ हजार रुपये किंमतीचे हे वाहन खरेदी केल्यानंतरही अग्निशमनच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी तब्बल १६ महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत अग्निशमन दलाला अस्तित्वातील ३९ मीटर उंचीच्या टिटीएलवरच अवलंबून रहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

 ३९ मीटर उंचीचे परदेशी बनावटीचे वाहन खरेदीवेळी किमान १० जवानांना ते हाताळण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक असताना केवळ २ जवानांनाच प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाहनाची वॉरंटी संपुष्टात आल्यानंतर त्याच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पालिकेने रोझनबाऊर कंपनीच्या तज्ञाला तब्बल ३ वर्षे ७० हजार रुपये महिना वेतनावर नियुक्त केले होते. यानंतर नादुरुस्त झालेल्या या वाहनाला दुरुस्त करण्यासाठी पालिकेने गेल्या वर्षी सुमारे ४३ लाखांचा खर्च केला. त्यातच पालिकेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या ६८ मीटर उंचीच्या टिटीएलसाठी ५ वर्षांनंतर देखभाल, दुरुस्तीपोटी लाखो रुपयांची तरतूद करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक