शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Mahad Building Collapse: टीडीआरएफ पथकासह अग्नीशमन दलाचे जवान घेऊन एकनाथ शिंदे महाडमध्ये दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 16:04 IST

महाड इमारत दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते.

ठाणे :  महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मदत कार्य वेगाने व्हावे यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे पोहोचले असून त्यांच्या सोबत ठाणे महानगर पालिकेची टीडीआरएफचे पथक आणि अग्नीशमन दलाचे पथक घटनास्थळी मदतीसाठी सकाळीच महाडमध्ये दाखल झाली आहेत.

महाड इमारत दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले होते. त्याचवेळी त्यांनी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांना ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके घटनास्थळी मदतकार्यासाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्यासोबतच  टीडीआरफ आणि अग्नीशमन दलाची ही दोन पथके रवाना झाली.

दोन्ही पथके सकाळी ७ वाजता दाखल होवून त्यांनी मदत कार्य सुरू केले आहे. एनडीआरएफ च्या जवानांसोबत टिडीआरएफ च्या पथकाने इमारतीचा ढिगारा उपसून त्यातील आडकलेल्या  रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरवात केली आहे. या इमारत दुर्घटना ग्रस्त रहिवाश्यां च्या सर्व प्रकारच्या मदत कार्यासह मारतीचा ढिगारा उपसण्याचे काम, तेथील सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी लक्ष केंद्रीत करुन शिंदे स्वत: महाडमध्ये तळ ठोकून आहेत. मदतकार्यास सुरूवात करण्यात आली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडBuilding Collapseइमारत दुर्घटनाEknath Shindeएकनाथ शिंदे