शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात लाखोंच्या घडयाळांची चोरी: झारखंडमध्ये पलायनाच्या तयारीतील दोघे कल्याणमध्ये जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 21:01 IST

पुण्यातील विश्रांतवाडीतील एका घडयाळाच्या दुकानातून लाखोंच्या घडयाळांची चोरी करुन झारखंडमध्ये पलायनाच्या तयारीतील शाहआलम शेख (५३, रा. साहेबगंज,झारखंड ) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कामगिरीसाडे चार लाखांचा माल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पुण्यातील विश्रांतवाडीतील एका घडयाळाच्या दुकानातून लाखोंच्या घडयाळांची चोरी करुन झारखंडमध्ये पलायनाच्या तयारीतील शाहआलम शेख (५३, रा. साहेबगंज,झारखंड ) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून चार लाख ४८ हजारांची २९० घडयाळेही जप्त केली आहेत.घरफोडीतील काही संशयित कल्याण रेल्वे स्थानकात येणार असल्याची टीप ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, संदीप चव्हाण, उपनिरीक्षक दिपेश किणी, हवालदार राजेंद्र सांबरे, भरत आरवंदेकर, हरीश तावडे, दिपक जाधव, अमोल देसाई, नंदकुमार पाटील आणि शब्बीर फरास आदींच्या पथकाने २० जानेवारी २०२२ रोजी कल्याण रेल्वे स्थानक येथून परराज्यात जाण्याच्या तयारीतील शाहआलम आणि रुंदल सिंग निरंजन सिंग (३०,रा. झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्येटायटन कंपनीची ५२ मनगठी घडयाळे, फास्टट्रॅक कंपनीची २३ मनगटी घडयाळे, मॅक्सीमाची १०५ तर सोनाटाची ११० अशी चार लाख ४८ हजार ३५३ रुपयांची २९० घडयाळे हस्तगत केली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी १८ जानेवारी रोजी पुण्यातील विश्रांतवाडीतील घडयाळाचे दुकान फोडून चोरी केल्याची कबूली दिली. हाच मुद्देमाल घेऊन ते त्यांच्या झारखंड राज्यातील मुळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.* पुण्यात चोरीचा गुन्हा -ठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये १९ जानेवारी रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. या दोघांनीही विश्रांतवाडीतील धानोरीतील भैरवनगर येथे राजेश्वरी वॉच अ‍ॅण्ड आॅप्टीशियन या दुकानाच्या खिडकीचे गज रात्रीच्या वेळी कापून चोरी केल्याचे उघड झाले.* या दोघांवरही गुन्हे दाखल -शाहआलम याच्याविरुद्ध झारखंडमधील राधानगर, नवी मुंबईतील वाशी आणि ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर रुंदल सिंगविरुद्ध झारखंडमध्ये गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी