जप्त केलेली लाखोंची कार जळून खाक
By Admin | Updated: March 28, 2017 13:11 IST2017-03-28T13:11:43+5:302017-03-28T13:11:43+5:30
शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांची पोलिसांनी जप्त केलेली पजेरो गाडी अचानक जळून खाक झाली आहे.

जप्त केलेली लाखोंची कार जळून खाक
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 28 - कल्याण डोंबिवली मुख्यालयात दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारी पश्चात पोलिसांनी केलेल्या कारवाईत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांची पजेरो गाडी जप्त केली होती. या गाडीची किंमत 25 लाख रुपये इतकी आहे. जप्त केलेली ही गाडी बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर उभी करुन ठेवली होती. ही गाडी जळून खाक झाली आहे. गाडी जळून खाक कशी झाली हा प्रश्न अनुत्तरीच आहे. सध्या उन्हाचा तडाखा जास्त असल्याने गाडीतील इंधनाने पेट घेऊन गाडी जळाली असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
गाडी पोलिसांच्या कस्टडीत असताना जळाल्याने त्याची भरपाई पोलीस नगरसेवक गायकवाड यांना देणार की नाही हे अद्याप स्पष्ट. नगरसेवकांच्या समर्थकांच्या मते गाडी पोलिसांनीच जाळली असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे गाडी जप्तीची कारवाई पोलिसांच्या अंगावर शेकणार असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी नुकसान भरपाई दिली नाही. तर शिवसेनेच्या स्टाईलने पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा गायकवाड समर्थकांनी दिला आहे.