आरोग्य केंद्र स्थलांतरित करा!

By Admin | Updated: May 12, 2016 01:57 IST2016-05-12T01:57:02+5:302016-05-12T01:57:02+5:30

प्रभाग समिती एकच्या इमारतीत असलेले आरोग्य केंद्र, वैद्यकीय प्रयोगशाळा, मध्यवर्ती औषध भांडार त्वरित पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात स्थलांतरित करा

Migrate Health Centers! | आरोग्य केंद्र स्थलांतरित करा!

आरोग्य केंद्र स्थलांतरित करा!

भार्इंदर : प्रभाग समिती एकच्या इमारतीत असलेले आरोग्य केंद्र, वैद्यकीय प्रयोगशाळा, मध्यवर्ती औषध भांडार त्वरित पंडित भिमसेन जोशी रुग्णालयात स्थलांतरित करा, रिक्त होणारी जागा प्रभागांतर्गतील कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी विनंती नवनियुक्त सभापती आसिफ शेख यांनी नुकतीच आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत हांगे यांनी ही कार्यालये त्वरित हलविण्याचा आदेश दिला. त्यामुळे वैद्यकीय विभागात नाराजी आहे.
ग्रामपंचायतीच्या काळात मुख्यालय असलेल्या इमारतीत सध्या प्रभाग समिती एकचे कार्यालय आहे. नगरपालिकेच्या काळापासून तेथे आरोग्य केंद्र, मध्यवर्ती औषध भांडार, क्षयरोग विभाग आहे. येथील मध्यवर्ती औषध भांडारातून सध्या पालिकेच्या १० आरोग्य केंद्रांसह स्व. इंदिरा गांधी वजोशी रुग्णालयांना औषधांचा पुरवठा केला जातो. जानेवारीत सुरू झालेल्या जोशी रुग्णालयाच्या बेसमेंटला औषधांचा साठा करण्यासाठी व्यवस्था आहे. त्यासोबतच तेथे लॉन्ड्री, हाऊसकिपिंगसाठी जागा देण्यात आली आहे.
मात्र, इतर विभागांसाठी रुग्णालयाच्या आराखड्यात तजवीज केलेली नाही. त्यातच हे चार मजली रुग्णालय सध्या दोन मजल्यावरच स्थिरावले असून उर्वरित दोन मजले अजूनही मोकळे आहेत. (वार्ताहर)प्रभाग कार्यालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील छताचे प्लॅस्टर काही महिन्यांपूर्वी कोसळले होते. त्यामुळे त्याच्या डागडुजीसाठी तेथील कर्मचाऱ्यांना स्थानिक संस्था कर विभागाच्या मुख्य कार्यालयात हलविण्यात आले होते.
त्यांना पुन्हा प्रभाग कार्यालयात स्थलांतरित करण्यासाठी शेख यांनी हांगे यांना विनंती केली होती. त्यानुसार हांगे यांनी ७ मे रोजी आदेश दिला आहे.
याबाबत शेख म्हणाले, की प्रभाग कार्यालयातील कर्मचारी एकाच ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यांना पुरेशी जागा मिळावी, यासाठीच हांगे यांना विनंती केली होती.

Web Title: Migrate Health Centers!