शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

१६00 फूट खोल दरीतून वाचवले परप्रांतीय कामगारांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 00:33 IST

आठ तासांचा थरार; मालकाने हुसकावल्याने पायी निघाले गावी

- श्याम धुमाळ कसारा : भिवंडी (वडपा) येथील एका गोदामात कामाला असणाऱ्या कामगारांना तेथील व्यवस्थापनाने गोदाम बंद असल्यामुळे हाकलवून लावले. यामुळे बुधवारी दुपारी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी पायी निघालेले चार मजूर कसारा घाटातील दरीत अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनास तब्बल ८ तास अथक परिश्रम घ्यावे लागले. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास त्यांची सुखरुप सुटका केली.लॉकडाउनमुळे अनेक परप्रांतीय मजूर मुंबई, ठाणे, कल्याणसह विविध ठिकाणाहून पायी गावाला निघाले आहेत. अनेक मजुरांची प्रशासनाने सोय केल्यानंतरही या मजुरांना त्यांचे घरमालक, कंपनीतील कंत्राटदार यांनी हाकलल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने कामगार पायी जात आहेत. रस्त्यावर पोलीस असल्याने काही जण डोंगर, दरीतून पायवाट काढत प्रवास करीत आहेत. असाच प्रवास भिवंडीतील गोदामात कामाला असणारे नरेंद्र चौधरी, भूपाल निसार, राजेश कोल आणि फुलचंद रावत हे करत होते. त्यांनी महामार्गावर लतीफवाडी व कसारा घाट माथ्यावर पोलिसांचे चेक पोस्ट असल्याने त्यांनी मुंबई- नाशिक महामार्गावरील चिंतामणवाडी येथून डोंगरातून जाण्याचा मार्ग अवलंबला. १२ ते १३ किलोमीटर चालल्यानंतर ते बुधवारी दुपारी जंगलात भरकटले. १६०० फूट खोल व घनदाट झाडी असलेल्या दरीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात रात्र झाली, पण रस्ता काही सापडत नव्हता. यातील एकाने १०० नंबरवर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली, तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. त्यानंतर कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीमने डोंगर परिसरात शोध घेतला. त्यांचे मोबाईल ट्रॅक करून लोकेशन काढले असता ते उंटदरीत अडकल्याचा अंदाज व्यक्त केला. अडकलेल्यांपैकी एकाशी मोबाइलवर संभाषण सुरु होते, ‘साहब हमें बचाव’ असे ओरडत होते. घाटनदेवी मंदिरासमोरील एका टेकडीवरून दरीत मोबाईल लाइट दिसला. यानंतर पोलीस कर्मचारी रामदास राठोड व आपत्ती व्यवस्थापन टीममधील लक्ष्मण वाघ व काही सदस्य सावरवाडी (कसारा खुर्द ) येथून उतरले तर कसारा घाट घाटनदेवी मंदिराकडून काही जण मदतीसाठी उतरले असता ८ तासानंतर ते सापडले.चौघांना दिले पोलिसांच्या ताब्यात१६०० फूट खोल दरीत अडकलेल्या मजुरांना टीमने वर आणल्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन टीमचे श्याम धुमाळ, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, प्रथमेश पुरोहित, रवी देहाडे, मयूर गुप्ता व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.