उल्हासनगर महापालिकेची मध्यरात्री स्वछता मोहीम; १०० कामगार तैनात, सर्वत्र कौतुक
By सदानंद नाईक | Updated: April 27, 2024 15:58 IST2024-04-27T15:56:46+5:302024-04-27T15:58:07+5:30
गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उल्हासनगर महापालिकेची मध्यरात्री स्वछता मोहीम; १०० कामगार तैनात, सर्वत्र कौतुक
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने मध्यरात्री १०० सफाई कामगारांच्या मदतीने डीप क्लिनिंग सुरू केली. गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्हासनगर म्हणजे अस्वच्छ शहर अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. मात्र महापालिका आरोग्य विभाग स्वच्छ व सुंदर शहरासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. गेल्या एका आठवड्यापासून आरोग्य विभागाने वर्दळीच्या मुख्य रस्त्याची स्वच्छता मोहीम सुरू केली. या मोहिमेत वर्दळीच्या रस्त्याची साफसफाई करून रस्त्यात साचलेली धूळ, रेती, माती उचलली जाते. रात्री ११ वाजता वाहनांची वर्दळ कमी झाल्यावर स्वछता मोहिमेला सूरवात होउन, सफाई पहाटे ५ वाजे पर्यंत स्वच्छता मोहीम अंतर्गत सुरू राहत असल्याची माहिती सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली. तसेच नेहमीची स्वच्छता अभियान सुरू असल्याचे हिवरे म्हणाले. आयुक्त अजीज शेख यांनीही रात्री सुरू असलेल्या डीप स्वच्छता मोहिमेचे स्वागत केले आहे.
महापालिका प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे यापूर्वीच खाजगीकरण केले असून वर्षाला ११ कोटीचा खर्च केला आहे. तर शहरातील कचरा उचलण्यावर व डम्पिंगवरील कचरा सपाटीकरणावर वर्षाला २० कोटी पेक्षा जास्त खर्च महापालिका करूनही कचऱ्याची समस्या जैसे थे आहे. दुसरीकडे मध्यरात्री रस्त्याची डीप क्लिंनिग सुरू केल्याने, रस्ते उजडल्याचे बोलले जात आहे.