मध्यमवर्गीयांना फायदा नाही
By Admin | Updated: March 3, 2015 01:39 IST2015-03-03T01:39:13+5:302015-03-03T01:39:13+5:30
मध्यमवर्गीयांना काहीच फायदा नसून फक्त पायाभूत सोयीसुविधांवर जास्त लक्ष देण्यात आल्याचे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

मध्यमवर्गीयांना फायदा नाही
मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना काहीच फायदा नसून फक्त पायाभूत सोयीसुविधांवर जास्त लक्ष देण्यात आल्याचे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने अर्थसंकल्पावर नि:पक्षपातीपणे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.जाधव बोलत होते. अर्थसंकल्प हा देशाला नवीन आकार देण्याचे काम करतो म्हणून यामध्ये सर्व बाबींचा समावेश करणे आवश्यक असते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये असे दिसत नाही. आर्थिक शिस्त लावण्याचे काम एक वर्ष लांबणीवर पडलेले आहे, शिवाय एका बाजूला गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले पण दुसरीकडे बचतवाढीसाठी कुठलीच तरतूद नाही. कृषिप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांवर अन्याय झालेला दिसून येतो. शिक्षण व कौशल्यविकासाच्या बाबतीत निराशा केली गेली आहे.
काळा पैसा व बेनामी मालमत्तेसंदर्भात कडक कायदे घोषित केले, पण याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत साशंकता असल्याचेही स्पष्ट केले. दलित आदिवासींकरिता तीस कोटींची घोषणा केली गेली, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत तेरा हजार कोटींनी हा आकडा कमी आहे. हे दाखवण्यात आले नाही. या दलित आदिवासींच्या हक्काच्या निधीतून व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे तीनशे कोटी रुपयांची कपात करून कॉर्पोरेट व संरक्षण क्षेत्रासाठी रान मोकळे करून देण्यात आल्याचेही या वेळी त्यांनी स्पष्ट केले. यासह अर्थसंकल्पावर अनेक सकारात्मक व नकारात्मक बाबींवर जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची निराशा
च्कृषिप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांवर अन्याय झालेला दिसून येतो. शिक्षण व कौशल्यविकासाच्या बाबतीत निराशा केली गेली आहे.