दुर्लक्षित कलाकारांना म्हात्रे यांचा मदत हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:10+5:302021-05-26T04:40:10+5:30

डोंबिवली : लॉकडाऊन लागू केल्यापासून शासन-प्रशासन कलाकार-कलावंतांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनसेचे संघटक प्रल्हाद ...

Mhatre's helping hand to neglected artists | दुर्लक्षित कलाकारांना म्हात्रे यांचा मदत हात

दुर्लक्षित कलाकारांना म्हात्रे यांचा मदत हात

डोंबिवली : लॉकडाऊन लागू केल्यापासून शासन-प्रशासन कलाकार-कलावंतांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनसेचे संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी त्याची दखल घेत डोंबिवलीतील कलाकारांना मदतीचा हात देत त्यांचा पुढील दोन महिन्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला.

सरकारने लाॅकडाऊन करताना कलाकार-कलावंतांचा विचार करायला हवा होता. थोडेफार निर्बंध लादून त्यांच्या चरितार्थाकरिता काही तरी व्यवस्था करायला हवी होती; परंतु त्यांच्याकडे सरकारने पाठ फिरवली असली तरी म्हात्रे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला. डोंबिवलीतील सर्व नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकारांनी आपली व्यथा म्हात्रे यांच्याकडे मांडली. या कलाकारांनी मदत मिळावी, याकरिता कोरिओग्राफर महेश दवंडे यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार रविवारी एका छोटेखानी कार्यक्रमात डोंबिवलीतील कोरिओग्राफर क्षेत्रातील एफआयडीएसचे सर्व सदस्य व नृत्य कलाकारांना म्हात्रे यांनी पुढील दोन महिने पुरेल इतके जिन्नस आणि अन्न-धान्याची मदत केली.

यावेळी श्याम पाटील, किशोर ठोसर, प्रथमेश जोगळेकर, भास्कर भाने, अनिल सणस आदी उपस्थित होते. डोंबिवलीतील जवळपास ३५ ते ४० कलाकार आणि कलावंतांनी त्याचा लाभ घेतल्याचे दवंडे म्हणाले. सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी या उपक्रमाला स्वेच्छेने, तसेच निःस्वार्थ वृत्तीने मदत करणाऱ्या म्हात्रे यांचे उपस्थित नृत्य कलाकार, कलावंत आणि नृत्य दिग्दर्शकांनी आभारही मानले.

----------------

Web Title: Mhatre's helping hand to neglected artists