शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोलबच्चन गँग : ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 01:09 IST

बोलबच्चन गँग : १२ तोळे सोन्याचे दागिने केले हस्तगत

ठाणे : बोलण्यात गुंतवून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाºया ‘बोल बच्चन गँग’च्या टोळीचा म्होरक्या राजू शेट्टी याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून १२ तोळे वजनाचे तीन लाख ९४ हजार ८५० रुपये किमतीचे दागिने हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वेगवेगळया प्रकारची बतावणी करून वयोवृद्ध महिला तसेच पुरुषांना अंगावरचे दागिने काढायला भाग पाडून नंतर ते त्यांच्याकडे दिल्याचा बहाणा करून धूम ठोकणाºया या टोळीने ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने अशा प्रकारचे गुन्हे करणाºया रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा अभ्यास करून त्यांचा शोध घेण्याची मोहीम ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सुरू केली होती. अशाच एका टोळीचा म्होरक्या राजू शेट्टी याची माहिती मिळाल्यानंतर त्याला मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल भागातून २३ आॅगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अटक केली. त्याने ठाण्यातील नौपाडा, खोपट, रेल्वे स्टेशन, प्रजापिता ब्रम्हाकुमारी चौक अशा अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना भुलथापा देऊन त्यांच्याकडील दागिने, रोकड आणि वस्तू लुबाडल्याची कबुली दिली आहे.ठाणे, मुंबईत या गँगचा धुमाकूळठाणे आणि मुंबई परिसरात धुमाकूळ घालणाºया बोलबच्चन गँगचा तो म्होरक्या असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे यांच्यासह निरीक्षक रणवीर बयस, उपनिरीक्षक दतात्रेय सरक, हवालदार सुनील जाधव, आनंदा भिलारे, रवींद्र पाटील आणि राहुल पवार आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. त्याच्याकडून फसवणुकीचे आणखीही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी