शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ठाण्यातील म्हाडाचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्याचा डाव स्थानिक रहिवाशांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:46 IST

म्हाडाच्या जागेतील भूखंड बिल्डरने कामगारांच्या झोपडया बांधून आणि बांधकामाची सामुग्री ठेवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने कारवाई करुन हा डाव हाणून पाडला.

ठळक मुद्देमहापालिकेने केली कारवाईपत्रे उभारुन अडविली होती जागाएमआरटीपी अंतर्गत कारवाईची मागणी

ठाणे : वर्तकनगर येथील म्हाडाच्या जागेतील समाजमंदिराचा भूखंड बिल्डरने पत्रे लावून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रहिवाशांच्या मागणीनंतर ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीने याठिकाणी कारवाई करून बिल्डरने उभारलेले बांधकाम आणि पत्रे उद्ध्वस्त केले. या बिल्डरविरुद्ध आता एमआरटीपीअंतर्गतही कारवाई करावी, अशी मागणी येथील राहिवाशांनी केली आहे.वर्तकनगर विभागातील म्हाडा वसाहतीमध्ये १९६५ पासून समाजमंदिराची ही जागा आहे. त्याठिकाणी अण्णासाहेब वर्तक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून कला, क्र ीडा आणि सांस्कृतिक कार्यक्र म साजरे होतात. या समाजमंदिराचा भूखंड सर्वसामान्यांसाठी खुला करावा, यासाठी मंडळामार्फत १९९० पासून वर्तकनगर महासंघामार्फत म्हाडाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. हा भूखंड खुला होण्याचे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे. एकीकडे ही प्रक्रिया सुरू असतानाच काही राजकीय पाठबळ मिळवून श्री सत्यदीप रियलेटर कंपनीचे मालक सत्येंद्र विश्वकर्मा या विकासकाने म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. त्याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कामगारांसाठी पत्र्यांच्या झोपड्या उभारून संपूर्ण भूखंडाला पत्र्याचे कम्पाउंडही केले. तसेच बांधकामाची इतर सामग्रीही ठेवली. हळूहळू हा भूखंड ताब्यात घेण्याचा बिल्डरचा डाव ओळखून स्थानिक रहिवाशांनी तसेच अण्णासाहेब वर्तक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत सातपुते यांनी ठामपा अधिका-यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार, ११ ते १६ मे या पाच दिवसांच्या कालावधीत वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त चारुशीला पंडित, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रभाकर शिंदे आणि लिपिक महेंद्र भोईर आदींच्या पथकाने बिल्डरने केलेले संपूर्ण बांधकाम उद्ध्वस्त केले. तेथील सामग्रीही हटवण्यात येऊन हा भूखंड मोकळा करण्यात आला. यावेळी स्थानिक रहिवासी केतन सुर्वे, अशोक कुलकर्णी आणि मंडळाचे पदाधिकारी जयसिंग नाईक, अनंत राऊत, गिरीधर राऊत, एम.एस. राणा, मधू टक्के, दिलीप मिस्त्री, राजेंद्र परदेशी तसेच अ‍ॅड. उज्ज्वला सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

‘‘समाजमंदिराचा हा भूखंड इतर कोणत्याही कंपनी किंवा संस्थेला देण्यात आला अथवा याठिकाणी पुन्हा असे अतिक्रमण कोणी केले, तर तीव्र जनआंदोलन केले जाईल. याची सर्व जबाबदारी ही पूर्णत: म्हाडाचीच राहील. आताही अतिक्रमण करणा-या या विकासकावरही पालिकेने एमआरटीपीची कारवाई करावी.’’प्रशांत सातपुते, अध्यक्ष, अण्णासाहेब वर्तक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे 

‘‘म्हाडा वसाहतीमधील या समाजमंदिराच्या भूखंडावर पत्रे टाकलेले होते. कामगारांच्या काही झोपड्याही बनवल्या होत्या. पत्रे लावून जागाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत, ठामपाच्या मुख्यालयातून आदेश आल्यानंतर याठिकाणी कारवाई करून हा भूखंड मोकळा करण्यात आला.’’चारुशीला पंडित, सहायक आयुक्त, वर्तकनगर प्रभाग समिती, ठाणे महापालिका 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाEnchroachmentअतिक्रमण